नवीन लेखन...

गोमुत्राचे फायदे

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.

गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.

१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे. ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.

गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.

गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.

— WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार 

3 Comments on गोमुत्राचे फायदे

  1. अगदी बरोबर Rectal atresia या आजारात गोमुञ फायदेशीर आहे का?? कृपया मार्गदर्शन करणे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..