भारतातील प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटण्याचे आयुर्वेदिक महत्वही आहेच. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे.
पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात.
खाली दिलेले सर्व सामान आपणाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळु शकेल. त्यात गुढळ्या असल्यास फोडून घेऊन , चांगले चाळून घ्यावे व हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
साहित्य
मसूर डाळ पीठ | 110 | ग्राम |
आवळकाठी | 10 | ग्राम |
सरीवा | 10 | ग्राम |
वाळा | 10 | ग्राम |
नागर मोथा | 10 | ग्राम |
जेष्टमध | 10 | ग्राम |
सुगंधी कचोरा | 10 | ग्राम |
आंबेहळद | 2 | ग्राम |
तुलसी पावडर | 10 | ग्राम |
मंजीस्ट | 10 | ग्राम |
कापूर | 2 | ग्राम |
हे घरी बनवलेले उटणे आपण सणासुदीला वापरु शकता. उटणे फक्त दिवाळीतच का वापरायचे? घरच्या घरी बनवलेले उटणे केव्हाही वापरता येईल.
खूपच सुंदर माहिती आहे.