जगभरात नेहमी आढळणारी व सर्व वयोगटातील लोकांची तक्रार म्हणजे घसा दुखणे. या दुखण्यामागची कारणे पण अनेक आहेत. सर्दीसायनसपासून कॅन्सरपर्यंत अनेक प्रकारच्या आजारात घसा दुखू शकतो. या बाबतीत योग्य निदान, वेळ न दवडता होणे महत्त्वाचे असते व त्याबरोबरच डॉक्टुरांकडून रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी होणेदेखील महत्त्वाचे असते. घशात खूप वेदना जाणवणे, घसा कोरडा पडणेखवखवणेखाज सुटणे ही वरवर दिसणारी लक्षण आहेत. या आजारात काही रुग्णांचा कानही दुखू शकतो. अनेक लोकांना तोंड उघडे ठेवण्याची सवय असते. त्यामुळे श्वा सामुळे घसा कोरडा पडू शकतो. जिवाणू किंवा जिवाणूजन्य दाह, ऍलर्जी, अति प्रदूषण, अति धूळ किंवा घरात कचरा सांडणे, सिगारेटचा धूर, उदबत्तीचा उग्र वास किंवा उदबत्तीचा धूर, अति मोठ्याने बोलणे, घट्ट कॉलरचा शर्ट किंवा घट्ट टाय वापरणे, घशाला इजा होणे, घशाचा कॅन्सर, शरीरातील बिघाड किंवा काही प्रकारचे आजार; तसेच काही शस्त्रक्रिया किंवा तपासण्यांनंतर घसा दुखू शकतो. अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, नाकाघशातून धूर जाणे, ऍसबेस्टॉस किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये किंवा भट्टीजवळ काम करणे यामुळेसुद्धा घशाचे आजार संभवतात.
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे ऍलर्जीक ऱ्हायनायटिस.
अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
जे धूम्रपान करीत नाहीत, (passive smoking) त्यांनाही त्रास होऊ शकतो.
डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
काही औषधांमध्ये उदा सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टारांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
काही रुग्णांना घशात गाठ असण्याची भावना होऊ शकते. आवाज बसतो, स्वरयंत्रणेचा दाह होतो, स्वरयंत्रणेच्या कूर्चा सूजतात.
अगदी घरगुती उपचारांमध्ये वाफारा घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे करता येते.
विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, प्लिहा सूजणे, अति लाळ गळणे असा त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply