नवीन लेखन...

घोरणे

घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात. काही लोक यामुळे उठून बसतात किंवा काहीजण कुस बदलून झोपतात. कुस बदलल्यामुळे बहुधा हा अडथळा थांबून श्वास सुरळीत होतो.

घोरण्याबरोबर अनेक आजारांशी नाते आढळून येते. घोरणा-या व्यक्तींना अतिरक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा आघात झाल्याने पक्षाघात होऊ शकतो. घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता, इ. निरनिराळी कारणे यामागे असतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते व घोरणे सुरु होते. लठ्ठपणामध्ये स्नायूंमध्ये चरबी साठून स्नायू दुबळे होतात. हे आजार नसतील तर उतारवयातील घोरण्यापासून ही व्यक्ती मुक्त असू शकते. घोरण्यामुळे श्वास अडून आचके येत असतील तर डॉक्टरकडे नक्की दाखवले पाहिजे. यासाठी काही तपासण्या करून घोरण्याचे कारण आणि प्राणवायू प्रमाणाची कमतरता निश्चित करता येते. छातीच्या डॉक्टरकडून तपासणी केल्यास रात्रभराचा घोरण्याचा आलेख व कार्डिओग्राम (ईसीजी) काढता येतो. यावरून निश्चित निदान करता येते. यातील बहुतेक लोकांना जीभ जडावल्यामुळे घोरण्याचा त्रास होत असतो. कारणाप्रमाणे यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. जीभ जागच्या जागी रहावी म्हणून प्लॅस्टिकची आधारपट्टी किंवा शस्त्रक्रियेने घोरणे दुरुस्त करता येते. योग्य आहार, व्यायाम, प्राणायामाचे काही प्रकार (उज्जायी व भस्त्रिका) वजन कमी करणे, कुशीवर झोपणे, या साध्या साध्या उपायांनी घोरण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो.

यातून उपाय न झाल्यास व त्रास जास्त असल्यास डॉक्टरकडे अवश्य गेले पाहिजे. डॉक्टरकडे जाण्या आधी काही उपाय करून पहिले पाहिजेत. उताणे झोपण्या एवजी एका कुशीवर झोपावे. विशेषतः डाव्या कुशीवर झोपणे हितकारक असते. त्यामुळे घशातले स्नायू एका बाजूला पडतात. आणि घोरण्याची गरज पडत नाही. झोपण्यापूर्वी नाकपुडीमध्ये एक स्प्रे फवरला जातो. त्यामुळे सुद्धा तात्पुरता दिलासा मिळू शकतो. झोपण्यापूर्वी चार तास आधी मद्यपान न करणे हाही एक घोरण्यावरचा सोपा उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक धुम्रपान करण्याने सुद्धा घोरणे वाढते. तेव्हा सिगरेटच्या संख्येत घट करणे हा घोरण्यावरचा एक उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक वजन असणे हेही घोरण्याच्या बाबतीत धोकादायक असते. तेव्हा वजन मर्यादित असणे हा एक चांगला उपाय आहे. घोरण्यावरचा आणखी एक उपाय म्हणजे थोड्याश्या उंच उशा वापरणे. घोरणार्याण व्यक्तीने, टाळूच्या विरुद्ध दिशेला जीभेचे टोक मागे वळवण्याचा प्रयत्न करावा. जीभ टाळूवर घासून खालच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा. घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या बाजूने दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करावा. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनचे मेडीकल डिरेक्टर बारबार फिलीप्स यांच्यानुसार, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..