डाएट इनफ्लमेटरी इंडेक्स (आहाराच्या सूजेचा तक्ता)
डाएट इनफ्लमेटरी इंडेक्स (आहाराच्या सूजेचा तक्ता) हया विषयीची माहिती आपण हया लेखात समजावून घेऊ या.
आहार आपल्या शरीरात सूज निर्माण करतो हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? शरीरावर कुठेही सूज आली तरच दिसते पण सूज दिसली नाही म्हणून सूज नाही असे समजू नये कारण प्रत्येक वेळी सूज दिसतेच असे नाही. शरीरातील अंतर्गत भागात आलेली सूज दिसत नाही. एखाद्या रोगाचा संसर्ग, एखादी इजा, एखाद्या गोष्टीमुळे होणारी चरचर (इरीटेशन) हया कारणांमुळे शरीरा अंतर्गत सूज येऊ शकते. हळूहळू ही अंतर्गत सूज शरीराच्या प्रत्येक पेशीत शिरकाव करू लागते. कालांतराने ह्या अंतर्गत सूजेचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो. हळुहळु ह्या सूजेचा परिणाम आरोग्यावर ही दिसू लागतो. एखाद्या पदार्थाची अॅलर्जी (वावडे), सांधेदुखी, कालानुरूप होणारे बदल, शरीरावर लवकर दिसू लागणे ही त्याची काही उदाहरणे आहेत.
जर ह्या न दिसणाऱ्या सूजेमुळेही आपल्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर नक्कीच त्या बद्दल काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी ही सूज मोजावी कशी आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी हया विषयी माहिती असणे उपयुक्त ठरेल.
पदार्थात विविध प्रकारचे अन्नघटक असतात. ह्या अन्नघटकांचे आपल्या आहारातील प्रमाण आपण जे अन्न खातो त्यावर अवलंबून असते. प्रत्येक अन्नघटकाचे काम वेगवेगळे आहे. ह्यातील काही अन्नघटक शरीरात सूज निर्माण करण्याचे काम करतात ज्याला आपण इनफ्लमेटरी प्रतिसाद म्हणतो तर काही अन्नघटक शरीरातील सूज कमी करण्याचे काम करतात ज्याला आपण अॅन्टी इनफ्लमेटरी प्रतिसाद म्हणतो.
अयोग्य आणि अपुऱ्या अन्नघटकांच्या सेवनामुळे शरीरात इनफ्लमेटरी प्रतिक्रियेचा प्रतिसाद वाढत जातो ज्यामुळे शरिरा अंतर्गत सूज येऊ शकते आणि त्या सूजेमध्ये वाढ ही होऊ लागते. ही वाढलेली सूज रोग निर्मीतीत भाग घेत असते ज्याचामुळे हळूहळू आपण काही रोगांना बळी पङू शकतो. जर आपणास असे काही रोग होऊ नयेत असे वाटत असेल तर आपणास आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात पदार्थांची निवङ अशी करावी लागेल की जा पदार्थांच्या सेवनाने शरिरा अंतर्गत सूज वाढण्या ऐवजी ती कमी व्हायला हवी म्हणजेच थोडक्यात आपला आहार अॅन्टी इनफ्लमेटरी असावा.
आहार आणि इनफ्लमेशनचा जवळचा संबंध आहे असे नवनवीन प्रयोग सिद्ध करत आहेत. काही आहार पद्धती / प्रकार हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी उपयोगी पडतात असे आढळले आहे. आशा प्रकारची आहार पद्धती प्रतिक्षम/ सुरक्षित आहारात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. उष्मांक, प्रथिने, चरबी, जीवनसत्व खनिज आणि अनुरेखीत (ट्रेस) खनिजे ही प्रतिक्षम आहारात (अॅन्टी इनफ्लमेटरी) महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात. जसेजसे प्रयोग पुढे पढे जात आहेत तसेतसे रोगावर नियंत्रण मिळविण्यात आणि रोग बरा करण्यात प्रतिक्षम आहार उपयोगी ठरतात असे निदर्शनास आले आहे. प्रयोगात ज्या आहारातून जीवनसत्व क, जीवनसत्व ई आरजिनीन, ग्लुटामिन, न्यूक्लिओटाईङस, आणि ओमेगा 3 ह्या अन्नघटकांचे प्रणाम जास्त आढळते त्या आहारामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते असे आढळले आहे. ङाएटरी इनफ्लमेटरी इंडेक्स चा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या आहाराचे मूल्यमापन करून त्या व्यक्तीला आहारात कोणकोणता व कसा बदल करणे आवश्यक आहे हे तपासण्यासाठी उपयोगी पडेल. ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही त्या व्यक्तीला मार्गदर्शन करता येईल की जेणेकरून त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
ह्या सर्व गोष्टी वरून असे जाणवले की अशी एखादी प्राप्तांक (स्कोर) पद्धति असावी की ज्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीच्या आहाराचे मूल्यमापन इनफ्लमेटरी आणि अॅन्टी इनफ्लमेटरी आहारामध्ये करता येईल. ङाएटरी इनफ्लमेटरी इंडेक्स मध्ये 45 पदार्थ, अन्नघटक, आणि फायटोकेमिकल्स ह्यांचा समावेश आहे.
ह्या तक्त्या बद्दलचा शोध काही वर्षांपूर्वी लागला आहे. जगभरात आहार आणि त्याचा सूज येणाऱ्या एखाद्या किंवा 6 इनफ्लमेटरी मारकर्सवर काय परिणाम होतो अशा शोध प्रबंधांचा आधार घेऊन हा तक्ता तयार केला आहे. इन्टरल्यूकीन – l (IL- l), IL-4, IL-6, IL-10, ट्युमरनेकरोसिस फॅक्टर आणि सी रिआक्टिव प्रोटिन आशा 6 घटकांचा इनफ्लमेटरी मारकर्सवर काय परिणाम होतो हे बघितले आहे. तक्ता बनवताना त्याचे मूल्यांकन खालील प्रमाणे केले आहे
प्रो-इनफ्लमेटरी: +1
नो चेंज इन इनफ्लमेशन: 0
अॅन्टी इनफ्लमेटरी: -1
अॅन्टी इनफ्लमेटरी पदार्थ – ज्या पदार्थातून फायटोकेमिकल्स आणि ट्रेस खनिज जास्त प्रमाणात मिळतात असे पदार्थ जसे की फळ, भाज्या, पालेभाज्या, अख्खं धान्य, कठीण कवच असलेली फळ व बिया, काही मसाले व मसाल्याचे पदार्थ उदाहरणर्थ आलं, हळद प्रो इनफ्लमेटरी पदार्थ – सॅच्युरेटेङ फॅट, ट्रान्स फॅट, कोलेस्टरॉल, साखरेचे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न प्रोसेसङ फूङ.
Leave a Reply