चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन,राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. मा.चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला’चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा.चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
Leave a Reply