सय्यादिना इफ्तिखार अहमद शरीफ उर्फ इफ्तिखार यांचा जन्म जालंदरचा. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला.मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केल्यानंतर इफ्तिखार यांनी कला लखनौ कॉलेज पासून चित्रकला डिप्लोमा कोर्स केला. इफ्तिखार यांना गाण्याची आवड होती आणि प्रसिद्ध गायक कुंदनला सेहगल यांच्या गायनावर ते प्रभावित होते. १९४४ साली तकरार” या चित्रपटाने त्यांनी बॉलीवुड मध्ये पदार्पण केले.
चित्रपट समीक्षक श्री.इसाक मुजावर यांनी एका ठिकाणी लिहीले आहे.
गायिका तथा अभिनेत्री सुरैय्या यांनी आपल्या बरोबर लग्न करावे म्हणून इफ्तिखार हे सुरैय्या यांच्या कृष्णकुंज समोर उपोषणाला बसले होते आणि त्यांना साथ देण्यासाठी दिलीप कुमार देखील सोबत होते .
इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.
इफ्तिखार यांचे निधन ४ मार्च १९९५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
Leave a Reply