पोलिओ मुलांना अपंग तर करतोच पण प्रसंगी त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. या व्याधीविरुद्ध भारतासह जगभर सुरू असलेल्या लढ्याला यश मिळत आहे. असे असूनही आपल्यासमोरील आव्हान संपलेले नाही. त्यामुळे पोलिओच्या निराकरणासाठी देशवासीयांनी या मोहिमेत खारीचा वाटा उचलायला हवा. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी युनेस्कोचे ‘गुडविल अॅम्बॅसिडर’ म्हणून बोलताना मांडलेल्या विचारांचे संकलन.
पोलिओ ही व्याधी रुग्णाला केवळ शारीरिकदृष्ट्या अपंग बनवते असे नाही, तर त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरणही होते. विशेष म्हणजे लहानपणीच योग्य काळजी घेतली तर या गंभीर व्याधीपासून बालकांचे संरक्षण करणे शक्य आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून आपण पोलिओविरुद्ध मोठी आघाडी उभारली असून या मोठ्या शत्रूपासून बालकांना वाचवण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. या शिस्तबद्ध पोलिओ निर्मूलन कार्यक’माला हळूहळू यश आलेले पाहायला मिळत आहे. या जागतिक पोलिओ निर्मूलनदिनी आपण देशातून या व्याधीचे उच्चाटन करण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत. पण, हे यश साजरे करताना भविष्यातील आव्हानांचेही भान ठेवायला हवे. कारण स्पष्टच सांगायचे झाले तर देशात अजूनही पोलिओचे अस्तित्व आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात पोलिओ शिल्लक असेपर्यंत त्याचा धोका संपणार नाही. पोलिओमुळे रुग्णाला अपंगत्व येते तसेच त्याचा मृत्यूही होऊ शकतो. खरे तर लहान मुलांसमोर इतरही अनेक धोके असतात. पण आपण हा धोका नक्की आणि कायमचा टाळू शकतो.पोलिओवर कशाची मात्रा चालते याची आपल्याला चांगली कल्पना आहे. देशात पोलिओनिर्मूलन मोहिम सुरू झाली तेव्हा रोज पोलिओचे 500 नवे रुग्ण आढळून येत होते. तेव्हपासून सुमारे 40 लाख मुलांना अपंगत्वापासून वाचवण्यात अपण यशस्वी ठरलो आहोत. याअंर्गत तुम्ही मला, लोकप्रिय क्रिकेटपटूंना आणि इतर सेलिब्रिटीजना दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पोलिओच्या लसीकरणाचे आवाहन करताना पाहिले असेल. गेल्या काही वर्षांमध्ये पाल्यांना आवर्जून पोलिओ डोस देणार्या पालकांच्या संख्येत लक्षणीय
वाढ झाली आहे. हजारो समर्पित आरोग्यकर्मचारी मैलोन् मैलांची वाट तुडवत पोलिओच्या लसी दुर्गम भागांत घेऊन जातात. या सर्वांबरोबरच सरकार आणि पुढार्यांचे सहकार्य, पोलिओचे रुग्ण शोधून काढणे आणि पोल
िओच्या विषाणूंचा नायनाट करण्याच्या नेटक्या प्रकि’येचा या मोहिमेवर खूपच चांगला परिणाम झाला आहे. या वर्षी अजवर पोलिओचे केवळ 39 नवे रुग्ण आढळले आहेत. 2009 मध्ये ही संख्या 741 एवढी होती. पण असे असूनही भारताच्या पोलिओनिर्मूलन कार्यक्रमासमोर विविध आव्हने उभी आहेत. या आव्हानांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर बालकांना सुरक्षित ठेवण्यात आपण अपयशी ठरू.पोलिओच्या विषाणूवर सातत्याने जोरदार हल्ले चढवल्यामुळे त्याचे अस्तित्व प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांपुतच मर्यादित राहिले आहे. या राज्यांमध्ये भटक्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. तसेच दुर्गम भागांमुळे प्रत्येक कुटुंबाला शोधून त्यातील लहान बाळांचे लसीकरण करणे शक्य होत नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये नुकत्याच आढळलेल्या काही पोलिओ केसेसचीही हीच कारणे आहेत. केंद्र सरकार तसेच जागतिक आरोग्यसंस्था, युनिसेफ आणि रोटरी इंटरनॅशनलसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यामुळे ‘पल्स पोलिओ’ मोहिम या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात मोठे यश मिळाले आहे; पण आपल्याला अजूनही मोठी मजल मारायची असून त्यासरठी संपूर्ण देशाने या मोहिमेला पाठिबा देण्याची गरज आहे.या मोहिमेकडे विशेष लक्ष देऊन ती यशस्वी करण्याची इतरही अनेक कारणे आहेत. पोलिओचे पूर्ण उच्चाटन झाल्यानंतर त्याचा आपल्य पुढील पिढ्यांना कायमचा फायदा मिळेल आणि या मोहिमेसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचून हा पैसा इतर आरोग्य कामांसाठी आणि इतर व्याधींच्या उच्चाटनासाठी वापरता येईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिओचे उच्चाटन झाल्यावर कोणत्याही कुटुंबाला पोलिओमुळे बालक गमवावे लागणार नाही आणि हे शक्य न झाल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला आणि आरोग्ययंत्रणेला त्याची किमत मोजावी लागेल, तसेच ते आपल्या मुला
साठी धोकादायक असेल.आपली वाटचाल योग्य मार्गाने सुरू आहे हे स्पष्ट आहे, पण आपल्या यशावर केवळ आपणच अवलंबून आहोत असे नाही. जगाच्या पोलिओविरुद्धच्या यशाचे मर्म भारताच्या यशात आहे. या व्याधीच्या उच्चाटनासाठी राखून ठेवलेल्या निधीमध्ये सुमारे 3,500 कोटी रुपयांची तूट आहे. जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी विविध दात्यांनी मिळून 2012 पर्यंत ही तूट भरून काढायला हवी. या आव्हानाला तोंड देण्यासाठी जागतिक समुदायाने पोलिओविरुद्धच्या लढ्याला नवसंजीवनी दिली आहे. सुदैवाने भारतात या व्याधीविरुद्ध लढण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मिळते. रोटरी इंटरनॅशनल ही त्यापैकीच एक. त्यांनी या कार्यासाठी लाखो रुपये उभे केले आणि बालकांच्या लसीकरणासाठी हजारो स्वयंसेवकांची व्यवस्था केली.’बिल अँड मेलिडा गेट्स फाऊंडेशन ‘सारख्या संस्थांच्या माध्यमातून बिल गेट्स यांच्यासारखी द्रष्टी मंडळी या मोहिमेला बळ देतात.या संस्था त्यांचे कार्य करत असल्या तरी प्रत्येक भारतीयाने आपापला खारीचा वाटा उचलायला हवा. या मोहिमेत खंड पडू न देण्याचा निर्धार प्रत्येकाने करायला हवा. त्यासाठी नेमक्या आणि स्पष्ट धोणाची गरज आहे. पोलिओ निर्मूलन मोहिमेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर प्रत्येक जण मुलांना पोलिओ डोस देईल याची आपण दक्षता घ्या यला हवी. तुमच्या मित्र आणि आप्तेष्टांना या मोहिमेचे महत्त्व वाटत नसेल तर त्यांना ते पटवून द्या. रेल्येस्थानक किंवा बस स्थानकावर पोलिओ डोस देणारी मंडळी दिसली, की तुमच्या बालकांना त्यांच्याकडे घेऊन जा आणि डोस पाजा. इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहन द्या.देशातील प्रत्येक बालकाला पोलिओपासून वाचवणे ही आपली सार्वत्रिक जबाबदारी आहे. या मोहिमेत यश मिळवून भारत या व्याधीला समूळ आणि कायमचा नष्ट करण्यास क
िबद्ध आहे हे जगासमोर सिद्ध करू या.(श्री. अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच युनेस्कोचे ‘गुडविल अॅम्बॅसिडर’ म्हणून बोलताना मांडलेल्या विचारांचे संकलन.)
(अद्वैत फीचर्स)
—
Leave a Reply