चला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,original शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला.आनंद झाला. गावोगावी जी साई ची मंदिरे आहेत ती (duplicate) आहेत हे आम्हाला माहितच नव्हते शिर्डी संस्थानाने ते जाहीर केले. देवा मंदिरे नकली असतात पण देवा आमच्या श्रद्धा तर असली आहेत ना! जशी मराठी
भाषा मंत्रालयाच्या दारात केविलवाणी उभी राहते तसा तू जुन्या विटेवर युगा युगा पासून उभा आहे. इतके दिवस आम्हाला लाजल्या सारखे होत होते. आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील
आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील लवकरच बडवे आमचाच विठ्ठल खरा आहे. दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या .असे जाहीर करतील म्हणजे रोज लाखोंची गर्दी पंढरपुरात होईल गर्दी साठी पंचतारांकित हॉटेल्स पब मैयखाने उभी राहतील राहिला आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे शोधिशी रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.
— ठणठणपाळ
Leave a Reply