तिच्या फाटलेल्या, फाडलेल्या अथवा फाडून घेतलेल्या जीन्समधून तिच्या गोऱ्या मांडया दिसत होत्या…
पुरुषांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पण त्या नजरेत वासना नव्हती एक प्रश्न होता…
हिला भीक लागलेय की भिकेचे डोहाळे लागलेत…
फक्त गोंदलेल गोंदण दिसावं म्हणून ती काय काय दाखवत होती…न बोललेलं बर …
मग म्हणणार पुरुषांच्या नजरेत वासना आहे…
मला वाटत पुरुषांनी आपल्या डोळ्यावर आता असा चष्मा लावावा ज्यातून फक्त कपडे दिसतील …
मग असा चष्मा लावणाऱ्यानाच बायका आज सभ्य समजतील…
ती म्हणत होती जणू मी माझ्या कपड्यांना आवर घालणार नाही तुम्ही तुमच्या नजरेतील वासनेला आवर घाला…
माझी नजर मग तिच्या मांड्यावरून तिच्या चेहऱ्यावर गेली …
पाहतो तर काय ही तर तीच मुलगी होती आपल्यासमोर चड्डीत फिरणारी…
आता तर मी तो चष्मा लावणारच…
कवी – निलेश बामणे
Leave a Reply