नवीन लेखन...

चहापानी

परवाच लाईटची दुरुस्ती व काही दिवसांपुर्वी पाण्याच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याकरिता सरकारी कर्मचारी (ठरलेल्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा, वैतागलेले, दमलेले, अनऊत्साही, सावकाशपणे काम करणारे, ना सुरक्षेची ऊपकरणे ना नियोजित वस्तु…. असो…) आले होते.
काम सर्वंच पातळीवर व्यवस्थित झाले… असे गृहीत धरुन कर्मचारीही खुश होते…
मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसुन प्रश्नचिन्ह होते..,,,,
त्यातील अनुभवी कर्मचाऱ्याने हसुन यथोचित पुढाकार घेऊन आमच्याकडे “चहापानी” मागितले…
हो…. नाही…… करत…, तडजोड करत….. शेवटी “मांडवली” झाली…..
बघा… म्हणजे सरकारी नौकरीमध्ये असुन…. बरेच आयोगाच्या प्रमाणे मासिक पगार घेऊन असे साधे कर्मचारीही जर “चहापानी” घेत असतील तर यांच्याप्रमाणे सरकारी शिपाई पासुन ते क्लासवन अधिकाऱ्यांपर्यंत असे कितीतरी अधिकारी “चहापानी” घेत असतील….
तेही स्वताःच “कर्तव्ये” करुन…
ना वेळेच बंधन…. ना दिवसांची मर्यादा ….
मग आपण निवडणुकीच्यावेळी जनकल्याणाच्या कामासाठी निवडुन दिलेल्या….
नगरसेवकांचे ……
खासदारांचे……
आमदारांचे…..
राज्यमंत्र्यांचे…..
केंद्रिय मंत्र्यांचे …..
“चहापानी”

नक्कीच यथोचित व मानाप्रमाणे भरगच्चच असणार..
हा अनुभव तर तमाम भोळ्या जनतेला असणारच..

विवेक जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..