चाणक्य म्हणजे बुद्धिमत्तेचे, शहाणपणाचे प्रतिनिधिक व्यक्तिमत्त्व. व्यवस्थापनाचा/प्रशासनाचा उद्गाता. अशा या चाणक्याच्या अनुभवसिद्ध शहाणपणाचे सार चाणक्यसूत्रे या आटोपशीर पुस्तकात संकलित केले आहे. मूळ संस्कृत सूत्र आणि लगेच त्याचा मराठी अनुवाद, अशी रचना असणारी एकूण 450 सूत्रे यात आहेत. कोणतेही सूत्र केव्हाही वाचा, त्यावर विचार करा, त्यानुसार आचार करा आणि यशस्वी व्हा. व्यावसायिक जीवन असो की, सांसारिक जीवन सर्वत्र ती सारखीच उपयुक्त व प्रभावी आहेत. यशस्वी जीवनाचा हा सोपा व प्रशस्त मार्ग आहे. पृ.48 किं. 50 रू. ISBN : 978-93-80232-19-5
चाणक्य सूत्रे जितात्मा सर्वार्थैस्संयुज्येत्।
मनोनिग्रही मनुष्याला सर्व अर्थ प्राप्त होतात. जगप्रसिद्ध आर्य चाणक्यच्या “कौटिल्य” अर्थशास्त्र या मानवी प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार असणार्या महान ग्रंथातील निवडक सूत्रे मूळ संस्कृत मध्ये आणि त्याचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेच अशा पद्धतीने “चाणक्य सूत्रे” या नावाने नचिकेत प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
मानवी व्यवहार व विविध संस्थागत व्यवस्थापन या संदर्भात आजही लागू होणारी किंबहुना याबद्दलच्या शहाणपणाचे सार असणारी ही सूत्रे म्हणजे आयते विचारधन आहे. केव्हाही कोणतेही पान उघडा दरवेळी तुम्हाला त्यात काही न काही विचार मौक्तिके सापडतील?
नागरी बॅंका, पतसंस्था या सारख्या आर्थिक विषयांशी संबंधित संस्थांमध्ये तर अशा पुस्तकांचे अधिकच महत्त्व आहे. प्रत्येक व्यवस्थापकाने नेहमी आपल्याजवळ बाळगावे व पारंपरिक, अनुभवसिद्ध चातुर्य ज्ञानाचा वापर आपल्या व्यवहारात करून आपण यशस्वी व्हावे व आपल्या संस्थेलाही यशस्वी बनवावी. सुमारे 400 हून अधिक सूत्रे असणार्या या अनमोल पुस्तकांची किंमत केवळ 50/- रू. आहे.
चाणक्य सूत्रे/नचिकेत प्रकाशन पाने : ४८ किंमत : 50रू. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015. (: 0712- 6536653, 6535167, टेलीफॅक्स:- 2285473 मो. 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply