नवीन लेखन...

चिनी वस्तू स्वस्त का आहेत?

पुण्यातील एक नामवंत उद्योगपती  चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा. 

खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.

असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.

चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे  इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?

मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?

काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.

एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे

कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात

2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.

भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे

आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,

म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?

बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते

हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशीद इत्यादी, त्यांची संपत्ती जप्त केली तर
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.

धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते

3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.

भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.

तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.

हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे

चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.

असो शेवटी मुखशुद्दी साठी

“गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो.”

चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या “कडक” बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.

1 Comment on चिनी वस्तू स्वस्त का आहेत?

  1. अनेक कटू सत्ये परखडपणे सांगणारा उत्तम लेख. लेखकाचे अभिनंदन . भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून निर्यात-प्रवण आर्थिक धोरण आखण्याऐवजी आयात-पर्याय शोधण्याचे धोरण आखले , कारण या देशातील अभिजनांचे लाड तसेच चालू ठेवायचे होते. पण या चुकीच्या धोरणांमुळे सतत चलनफुगवटा आणि भाववाढ होत राहिली ज्यात सामान्य माणूस भरडून निघाला . आज निदान दोन ट्रिलियन डॉलर्सचे आंतर-राष्ट्रीय भांडवल गुंतवणुकीच्या जागा शोधत आहे . भारताचे सरासरी वय लहान असल्याचा मोठा फायदा भारताला (चीनच्या मानाने) होऊ शकतो. पण हे नवे मनुष्यबळ शिक्षण आणि पोषण यातून नीट जोपासून त्याची उत्पादकता वाढविण्याची नितांत गरज आहे . अमेरिका आज चीनच्या हळूहळू विरोधात जात आहे, त्याचाही फायदा भारताने करून घ्यायला शिकले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..