नवीन लेखन...

चूक

विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता. त्याने विजयला प्रश्न केला,’ कोठे आहेस ? उत्तरादाखल विजय म्ह्णाला,’’ आहे इकडे ! मुंबईतच ! त्यावर तो गृहस्थ म्ह्णाला,’ मला वाटल गावी गेलास की काय ? त्यावर विजय भयंकर संतापला, त्याचा राग त्याच्या डोळ्यात उतरला आणि त्याचे डोळे किंचित लाल झाले. पण तरीही स्वतःच्या रागाला आवर घालत विजय शांतपणे म्ह्णाला,’ हो ! आता तेवढेच बाकी आहे. ते ऐकून तो समोरचा गृह्स्थ काय समजायचे ते समजला त्यानंतर त्याने कामाशिवाय त्याला पुन्हा फोन करण्याची हिंमत बहुदा केली नसावी. विजयकडून गोड बोलून आपली कामे फुकटात करून घेणारी, त्याची ओळख स्वतःची कामे करून घेण्यासाठी वापरणारी, त्याच्या माध्यमातून प्रसिध्दी मिळवून स्वतःच मोठेपण सिध्द करणारी आणि कालांतराने त्यालाच मुर्खात काढणारी अनेक मंडळी त्याच्या आजूबाजूला, त्याच्या आयुष्यातच नव्हे तर त्याच्या घरातही होती. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेत आहेत हे त्याच्या लक्षात येत नव्हते असे नाही. पण आपण कोणाच्यातरी कामी येतोय यातून मिळणारे मानसिक समाधान त्याच्यासाठी खूपच मोलाचे होते. दुसर्‍यांसाठी त्याग करण्याचा विजयचा स्वभाव त्याला आज अक्षरशः रस्त्यावर घेऊन आलेला होता.

वयाच्या सोळाव्या वर्षी विजयने एका कारखान्यात कामाला सुरूवात केली होती. त्यापूर्वी वयाच्या दहाव्या वर्षापासून विजयने त्याच्या वडिलांसोबत अनेक छोटे-मोठे धंदे केले होते. विजयचे वडील हाडाचे व्यावसायिक पण या व्यावसायांमुळेच विजयचे बाळपणच नव्हे तर त्याचे तारूण्यही त्याच्यापासून हेरावले गेले होते. एका शास्त्रज्ञाच्या तोडीची बुध्दीमत्ता असणारा विजय त्याच्या निस्वार्थी वृत्तीमुळे आणि त्यागामुळे आज मुर्खांच्याही उपाहासाचा विषय ठरत होता. ज्या वयात मुल गोट्या खेळतात त्या वयात विजय अनवानी कांदे – बटाटे विकत होता. फक्त कांदे बटाटेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला बसून बाकड्यावर विकता येतील अशा जवळ – जवळ सर्वच वस्तू त्याने विकलेल्या होत्या. विजयने त्याच्या वडिलांसोबत केलेला एकही धंदा कधी तोटयात गेलेला नव्हता. आजही विजय ज्याच्या गल्ल्यावर उभा राहतो त्याच्या गल्ल्यावर लक्ष्मी खूश होत असते. विजय खूप भाग्यवान आहे हे त्यालाही चांगलेच माहित आहे. पण विजयचा राग तितकाच विनाशक आहे. सहसा तो रागावला असताना त्याच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत कोणालाच होत नाही. त्याच्या डोळ्यात पाहताच मी – मी म्हणणारे ही विरघळतात. तसा तो सहसा कोणावर रागावतही नाही. खरं म्ह्णजे त्याच्या परिस्थितीने त्याला त्याच्या रागावर नियंत्रण मिळवायला भाग पाडले होते. अथक प्रयत्नाने विजयने आपल्या रागावर नियंत्रण मिळविलेले होते. त्यामुळे तो काही लोकांना कमालीचा शांत आणि भोळा वाटतो. शाळेत असताना वर्गातील सर्वात शांत मुलगा म्ह्णून त्याची ख्याती होती. पण ती फक्त वर्गातील चार भितीतच होती. विजयला सहसा राग येत नसे आणि आला तर त्याला कोणीही आवर घालणे अश्यक्य होते. विजय सातवीत असताना त्याच्या वर्गातील एका मुलाने त्याला वर्गात असताना भयंकर त्रास दिला. वर्गात त्याने तो देत असलेला सगळा त्रास निमूटपणे सहन केला आणि शाळा सुटल्यावर शाळेपासून काही अंतरावर असणार्‍या मुख्य रस्त्यावर येताच त्याने त्या मुलाला बदडवले. विजयचे ते रूप पाहून तो मुलगाही फक्त पाहतच बसला आणि त्यांच्या वर्गातील इतर मुलही. विजय दिसायला हाडकुला असला तरी तो ताकदवान होता नव्हे तर कोणावर ही प्रहार करण्याची एक विशिष्ठ पद्धती त्याने आत्मसात केलेली होती. वरवर बर्फासारखा दिसणारा विजय आत मध्ये अत्यंत उष्ण होता. विजयच्या तापट स्वभावाची भिती विजयला स्वतःलाही कधी – कधी वाटते. कारण कोणी त्याच्या बाबतीत स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी हिंमत तो कित्येकदा करून गेला होता. आजही त्याच्या हितचिंतकांना उगाचच वाटते की त्याच्या साध्या- भोळया स्वभावाचा लोक फायदा घेतात. पण तसं काही नसते, विजयचा फायदा घेइल अशी व्यक्ती या जगात जन्मालाच आलेली नाही. विजय जे – जे स्वतःच्या अथक प्रयत्नाने उभ करतो ते तो धुळीत मिळवायला क्षणाचाही विचार करत नाही. विजय माणसे कधीच जोडत नाही ती त्याला त्याच्या परोपकरी आणि निस्वार्थी स्वभावामुळे आपोआप जोडली जातात. त्यामुळे त्याला जोडल्या गेलेल्या माणसातील दोन- चार इकडे- तिकडे झाल्यास काहीच फरक पडत नाही. तो मागे वळून त्याच्यासोबत असणर्‍या माणसांकडे कधी पाहातही नाही. विजयने त्याच्या आयुष्यातील सारेच निर्णय काही क्षणात घेतलेले आहेत. विजयचा कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याचा वेग सार्‍यांसाठी कौतूकाचा विषय आहे अपवाद फक्त एकच ते म्ह्णजे लग्न ! विजयचा सल्ला घेण्यासाठी कित्येक लोक विजयची चातकासारखी वाट पाहात असतात. त्याच्याकडून सल्ला घेणारे काही जेंव्हा बेडकासारखे फुगून फुटतात तेंव्हा विजय दुःखी होत नाही तर आनंदी होतो त्यांना अद्दल घडल्याचे पाहून.

विजय आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारावी म्ह्णून एका कारखान्यात अकुशल कामगार ( हेल्पर ) म्ह्णून कामाला राहिला होता पण मुळात अत्यंत बुध्दीमान असणारा विजय हळू-हळू कुशल कामगारांचे कामही करू लागला ते ही हेल्परच्या पगारात त्यामुळे त्या कारखान्याचा मालक त्याच्यावर खूश होता तो त्याच्यावर नवनवीन जबाबदार्‍या टाकू लागला त्या कारखान्याची एक चावी ही त्याच्याकडे आली पण तरीही त्याला पगार मात्र हेल्परचाच दिला जात होता. विजय त्या कारखान्यात सर्व कामात तरबेज झाल्यावर त्या कारखान्याचा मालक जुन्या कुशल कामगारांना फाट्यावर मारू लागला. विजयच्या जिवावर त्याने अनेक कुशल कामगारांना कामावरून सहज कमी केले. तेंव्हाच विजयने ठरविले हा कारखाना आपण सर्वात शेवटी सोडून जायचे आणि आपण हा कारखाना सोडल्यावर कारखाना बंदच राहायला पाहिजे. झाले ही विजयच्या मनासारखे त्या कारखान्यातील विजय सोडून सारे कामगार काम सोडून गेले आणि त्यानंतर फक्त विजयच्या जिवावर चालणारा कारखाना बंद ठेवायचा की सुरू हे विजयवर अवलंबून होते. आजही तो कारखाना उगडला जातो तो विजय कामाला येणार असेल तरच. त्या कारखान्याच्या मालकाला विजय नेहमीच मुर्ख वाटत राहिला. आपण त्याच्या मुर्खपणाचा फायदा उचलून अधिक पैसे कमावतोय असा समज करून घेत राहिला. त्या मालकाने विजयचे जितके नुकसान केले त्याच्या शंभरपट विजयने त्याच्याही नकळत त्याचे नुकसान केले होते. तो त्याच्या नफ्याचे गणित मांडत राहिला आणि विजयने त्याच्या भविष्याचे गणित अगोदरच मांडलेले होते. तो मालक स्वतःच विनलेल्या जाळ्यात अडकून पडला होता. आज त्याला विजयवर अवलंबून राहावे लागत होते आणि विजयने त्याला दुसरा पर्यायच ठेवला नव्हता. विजयला सारं काही जमत पण कोणाला मा॑फ करणं जमत नाही हा एकच दुर्गुण आहे त्याच्यात ! अगदी त्याच्या आई – वडिलांनीही त्याच्या बाबतीत केलेल्या चुकांची त्यांना काय शिक्षा द्यावी ? हे ही त्याने अगोदरच निश्चित केलेले होते. त्यासाठी प्रसंगी त्याला होणारा प्रंचड त्रास सहन करण्याचीही त्याची तयारी होती.

विजय लहानपणापासूनच एका मुलीवर प्रेम होत. शक्य झाल असत तर कदाचित त्याने तिच्याशी लग्नही केल असतं. एक दिवस तिच्या आईने त्याला तिच्याशी लग्न करणार का ? म्ह्णून विचारल असता तो क्षणाचाही विचार न करता नाही म्ह्णाला कारण तिच्या आईने त्याच्या परिस्थितीवरून एकदा त्याला अपमानीत केले होते. त्याचा राग म्ह्णून तो जिच्यावर जिवापाड प्रेम करत होता तिच्या सोबत लग्न करण्याची संधी त्याने स्वतःहून नाकारली होती. त्याचा त्रास विजयला आजही होतो. एक चांगला वकील होण्याचं त्याचं स्वप्न भंगल होत. ते स्वप्न भंगायला विजय आपल्या आई-वडिलांना कारणीभूत धरत होता. त्याची शिक्षा म्ह्णून त्याने त्याच्या मनाशी काय करायचं ते पक्क ठरवलं होतं की आपण आपल्या आयुष्यात आपल्या आई- वडिलांच एकही स्वप्न पूर्ण करायचं नाही. त्याच्या आई – वडिलाना सतत एक प्रश्न सतावतो की आपला प्रचंड हुशार मुलगा हात टाकेल तेथून यश खेचून आणणारा त्याच्या आयुष्यात इतका अपयशी का राहिला ? त्याच्यासाठी ते आपल्या पूर्वजांनाही दोषी मानतात उगाचच ! विजयच्या एका जिवलग मित्राला हे सत्य ज्ञात आहे की विजयच्या ज्या क्षणी मनात येईल त्याक्षणी तो जमिनीवरून क्षणार्धात अवकाशात झेपावू शकेल. विजय नेहमीच सर्वांशी अत्यंत नम्रपणे आणि आपल्याला जगाची काही खबरच नाही असा वागतो. कित्येकांच्या नकळत विजयने त्यांची आयुष्ये घडविली होती आणि कित्येकांची बिघडविलीही होती. ज्या – ज्या कोणी विजयशी पंगा घेतला त्या – त्या प्रत्येकाला त्याने आकाशातून जमिनीवर आणले अगदी बेमालूमपणे ! ज्या गोष्टी विजयने केल्या असतील अशी कोणी कल्पनाही केली नसेल अशा कित्येक गोष्टी त्याने केल्या होत्या. ज्या पासून जग अनभिज्ञ राहणार होतं. विजयला अनेकांची अनेक गुपिते माहित आहेत ज्यावरून त्या व्यक्तीच त्याच्या आयुष्यातील स्थान ठरलेलं असतं. लोकांना कळत नाही की या विशिष्ठ व्यक्तीशी तुटकपणे का वागतो तर त्यामागे त्या व्यक्तीची त्याला कळलेली गुपिते हेच कारण असते बर्‍याचदा !

विजयला समजून घेण हे सर्वसामान्य माणसांचं काम नाही हे त्याला पक्क ठाऊक आहे. म्ह्णूनच सर्व सामान्य माणसांत रमण त्याला कधीच जमत नाही. समाजात माणूसघाण्या अशी त्याची जी प्रतिमा झालेली आहे ती प्रतिमा तो सहज बदलू शकत होता पण ती त्याला बदलायचीच नाही कारण त्याला खात्री आहे एक दिवस संपूर्ण जग त्याच्या कार्याची दखल घेईल असं कार्य तो त्याच्या आयुष्यात करणार आहे. त्यासाठी त्याने त्याच्या अक्क्या कुटुंबास वेटीला धरायचं ठरवल होत. तो जगासाठी जगणार होता. भलं जगाचं करणार होता. पण त्याचा त्रास मात्र त्याच्या कुटुंबालाच होणार होता. तो हे ही विनाकारण करणार नव्हता. विजयच्या कुटुंबातील प्रत्येकाने कळत – नकळत त्याच्या स्वप्नांना सुरूंग लावला होता. त्याची शिक्षा त्यांना त्याला द्यायची होतीच !
प्रत्यक्ष आयुष्यात वकील न होऊ शकल्याचा राग तो असा काढत होता त्याच्या आयुष्यातच त्याच्या अवती- भोवती चुका करणार्‍या लोकांना त्यांच्याही नकळत त्यांच्या चुकांची शिक्षा देऊन…

— निलेश बामणे.

निलेश दत्ताराम बामणे,
( कवी,लेखक आणि संपादक- मासिक ‘साहित्य उपेक्षितांचे’ )
पत्ता- वेदान्त कॉम्प्युटर, श्रम साफल्य सो. स्मिता इंटरप्रायझेसच्या शेजारी, संतोष नगर बसस्टॉप जवळ,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) मुंबई-400 065 मो. 9029338268, 8652065375
Email – nileshbamne10@gmail.com

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..