नवीन लेखन...

चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६

चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते.

काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे 150 पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. दिंडीचे भव्य स्वागत कार्यक्रम स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच या महाकाव्यसम्मेलनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नयना आपटे यांनी केले. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, मनसे नेते सदाशिव मते, मनसे प्रमुख संघटक सुनील बसाखेत्रे, माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलंकर, पुण्यनगरीचे राधाकृष्ण नार्वेकर, संपादिका राही भिडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील विविध लेखक, पत्रकार, कवी व कवयित्री देखील आवर्जून उपस्थित होते.

एकदिवसीय असलेल्या या महासंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी संयोजक प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या सहयोगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन जयवंत बामणे व सौ. संगिता शांताराम कारंडे यांनी केले होते. या महाकाव्यसम्मेलनामध्ये प्रत्येकास काव्यवाचनाची संधी देण्यात आली. प्रत्येकास सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

 

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..