नवीन लेखन...

छत्रपती शिवाजी महाराज

आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो , आज मी जगाचा इतिहास बदलवणा-या श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचा मृत्यू रायगडावर झाला. आजवर अनेक राजे होऊन गेले परंतु पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेला हा राजा इतिहासात अमर झाला. शहाजीराजे आणि जिजबाइन्च्या या पुत्राने चालणे पिचलेल्या महाराष्ट्राला स्वत:चे राज्स्वराज्य दिले. याच मराठी राज्याने पुढे १८१८ पर्यंत जवळजवळ पुर्ण भारतावर अंमल चालवला.

लहानग्या निजामाला मांडीवर घेऊन शहाजीराजांनी अहमदनगरच्या निजामशाहीचा कारभार पहिला. अल्पकालाच्या या अनुभावाने त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पहिले. हे स्वप्ना पूर्ण केले ते शिवरायांनी. लहान असताना महाराजांनी जिजाऊ मासाहेबांच्या तोंडून रामायण- महाभारतातील अनेक कथा ऐकल्या. त्यांच्यावर  संस्कार झाले ते शूर, निधड्या, कर्तव्यदक्ष राजांचे. यातून घडलेल्या महाराजांनी मग रांगड्या मावळ्यांचे सैन्य बांधून आधी आदिलशाही, मग मोगल सत्तेचा पराभव केला व साकार झाले स्वराज्य.

अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला वध, सिद्दी जौहरच्या पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून सुटका, साहिहीस्तेखानाची लाल महालात छाटलेली बोटे, आग्र्याहून सुटका, सुरतेची लुट किती तरी घटना महाराजांच्या कुशल युद्धानितीची साक्ष आहेत.

महाराजांनी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. त्यांनी दिलेल्या आज्ञापत्रातील सुचना आजही पाळल्या पाहिजेत. यात त्यांनी प्रजेवर अन्याय करण्यास, झाडे तोडण्यास ,मनाई केली आहे.

महाराजांनी बांधलेले स्वराज्य इतके मजबूत होते कि त्यांच्या मृत्युनंतरही मराठे सत्तावीस वर्षे मोगलांशी लढतच राहिले. महाराजांनी घडवलेले हे सैन्य भारतभर दिग्विजय करत फिरले. इंग्रज, पोर्तुगीज, हब्शी यांना समुद्रावरच रोखून धरण्याकारीता महाराजांनी आरमार उभे केले. असे सर्व बाजूंनी संरक्षित केलेले मराठी स्वराज्य मग खूप मोठे झाले. महाराजांच्या त्या प्रेरणादायी आठवणींनी आजही महाराष्ट्राला स्फूर्ती मिळते.

धन्यवाद.

जय शिवाजी जय भवानी.

—————————————————————————————————

देवव्रत राजेंद्र चौरे, ५वी अ १, महात्मा स्कूल ऑफ अकॅडेमिक्स अंड स्पोर्ट्स, न्यू पनवेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..