असं म्हणतात कि, बाहेरुन झालेली जखम कालांतराने भरुन निघते पण; मनाला झालेली जखम भरुन निघनं फार कठिण असतं. बर्याचदा असं होतं कि, आजपर्यंत आपण ज्याच्यावर जिव लावला, ज्याला आपलं समजलं, सगळ्यांच्या यादित ज्याला सर्वात वरचं स्थान दिलं, आता फक्त जगणं पण त्याच्यासाठी आणि मरंणसुद्धा अशी स्वताची समजुत करुन घेतली अशा
व्यक्तीकड़ुन जर धोका मिळाला तर तुमची काय अवस्था होईल? काय अशा परिस्थीतित स्वतःला तुम्ही सावरु शकाल? तर नाही.मग त्या व्यक्तीमध्ये तुमचे आई-वड़िल असतील, भाऊ-बहिण असतील, तुमची बायको असेल, किंवा तुमची मैत्रीण असेल, अशावेळी तुमचं सर्व संपलेलं असेल, तुम्ही फक्त जिवन जगायचं म्हणुन जगत असाल, मग अशा अर्थशुंण्य जिवनाचा काय उपयोग? तेंव्हा तुम्हाला नक्कीच असं वाटेल कि, जगायचं ते का, कशासाठी आणि कोणासाठी? आयुष्यात याच्यापेक्षा मोठी चुकि दुसरी कोणतीच नसेल असंच तुम्हाला वाटेल.जर आपल्या वागण्यामुळे एखाद्याच्या जिवनात ईतका बदल होत असेल तर आपण का असं वागावं? का अशा जखमा कराव्यात कि, ज्या कधीच भरुन निघणार नाहीत.आयुष्य हे फक्त दुखःच अनुभवण्यासाठी असतं असं नाही तर त्यात सुखाचीही अपेक्षा प्रत्येकाने केलेली असते.
— प्रमोद पाटील
Leave a Reply