नवीन लेखन...

जग आणि देह – एक साम्य

शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगले, तलाव, प्राण्यांची हलचाल हा जसा बाहेरचा देखावा दिसतो, आगदी तसाच रचनात्मक पद्धतीने शरीराच्या आंत दिसला. वेगळेपणा जो भासत होता तो केवळ बघण्याच्या दृष्टीकोणामुळे. दोन्हीमध्ये जसे सौंदर्य होते, तसेच भयानकता देखील जाणवत होती. वाहीन्यामधून वाहणारे द्रव, रक्त, सारे शरीरभर वाहत होते. अवयवांत जमा होत होते. मोठ्या बहीरगोल भिंगामधून (  Magnifying lens )  त्याचे चित्र जणू निरनिराळ्या लोक व प्राणीच्या वस्त्याप्रमाणे जंगलाप्रमाणे भासत होते. त्यांची जा- ये हालचाल ह्या जरी सुक्ष्म असल्या तरी जणू वस्त्या, गांव, सडक, नदी, तलाव, इत्यांदींची अगदी हूबे हूब प्रतीकृती त्या सर्व देहातील स्थुल व सुक्ष्म रचनेमध्ये अगदी स्पष्टपणे जाणवत होती. एका भागातले अन्न, पाणी, हवा, वा इतर जीवनघटक पदार्थ एका अवयवातून दुसरय़ा अवयवामध्ये वाहीन्याच्या जाळ्यामार्फत नेल्या जातात. जे त्यावेळी काढून टाकण्यात आले, त्यालाच तज्ञानी हानीकारक वा रोगाची वाढ म्हटले गेले. शरीरातील अवयव रचनेचा व ह्या रोग रचनेचा देहांत असांच सदैव संघर्ष होत असतो. शरीरातील टिश्यू नष्ट होणे, पुन्हा नविन निर्माण होणे, ह्या क्रिया सतत चालतात.   जगातील वातावरणात वा परिसरांत देखील अशाच लोक, प्राणी, झाडे, जंगले, पर्वत, ह्या सर्वांत सतत हालचाली निर्माण होणे वा नष्ट होणे चालत असतात. रचनेमधले वर्णन जरी भिन्न वाटले तरी ह्या जगामधले आणि देहामधले सर्व स्थुल वा सुक्ष्म घटक पदार्थ कार्यानी, कार्याच्या लक्ष्यानी एकच असल्याचे भासतात. ते म्हणजे उर्जा निर्मिती व सर्व प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग करणे हेच नव्हे काय  ?

जगाची जशी भौगोलिक रचना असते, ती पदार्थाची अथवा निर्जीव साधनांची असते. त्याच वेळी जो इतिहास बनत असतो तो सजीव प्राणीमात्रांचा. मानवी देहांत देखील अशाच प्रकारे इतिहास भूगोलाची सतत पुनरावृत्ती होत राहते. शरीरातील अवयवांची वाढ होत जाणे आणि त्याच वेळी अनेक रोगांची देहावर आक्रमणे होणे त्याच प्रकारचे ठरते. ह्यांत तोड-मोड-जोड होत राहते. नष्ट होणे वा विकास पावने सतत घडत जाते.

शरीरामध्ये सुक्ष्म भाग हा पेशी असतो. अगणित पेशींची ग्रंथी बनते. अनेक ग्रंथींपासून अवयव बनतात. अनेक अवयव एकत्र येऊन शेवटी शरीर बनते.

पेशींच्याच स्थरावर उर्जा शक्ती निर्माण होते. बाहेरुन मिळणारे घटक पदार्थ हवा, पाणी अन्न ह्यांच्या  मदतीने उर्जा निर्मीती होते. देहाच्या सर्व हालचाली क्रिया ह्या शक्तीनेच पूर्ण केल्या जातात. जगामध्ये देखील प्रत्येक पदार्थात सुक्ष्म घटक अणू असून त्यात देखील उर्जा निर्मीत वा साठवलेली असते, जीला अणू उर्जा म्हणतात.  तीची शक्ती प्रचंड प्रमाणात असते. निसर्गामधल्या दिसणारय़ा, जाणवणारय़ा आणि न दिसणारय़ा, आद्रष्य असलेल्या सर्व हालचाली व क्रिया ह्या केवळ ह्याच उर्जेमुळे होत असतात. जगाला ह्या उर्जा शक्ती मोठ्या गृहाकडून, सुर्याकडून मिळते.  ह्यामुळे मानवी देहाचे, कार्याचे, व जीवनचक्रांचे सारखेपण साधर्म ह्या जगांप्रमाणे भासते हे म्हटल्यास चुक ठरणार नाही.

म्हणूनच सत्य वचन आहे की     ” जे पिंडी ते ब्रह्मांडी ”

आणि जर देहाप्रमाणे जग असेल, जगाप्रमाणे विश्व वा ब्रह्मांड असेल तर कल्पना करता येईल की सारे  ‘विश्व’   हे एक प्रचंड, अनंत, भव्य दिव्य  ‘देहधारी’   शक्तीस्वरुप आहे. ती केवळ कल्पना असली तरी त्याचे वर्णन अवलोकन ज्ञान हे मानवी विचारांच्या कितीतरी बाहेर आहे. त्यामुळे ‘ परमात्मा ‘ आहे  येवढेच आम्ही म्हणू शकतो. तो कसा  कोठे  ह्याची उकल करणे शक्यच नाही. तो केवळ  ‘उर्जामय ‘ असल्यामुळे, त्याला जाणता येते येवढेच समाधान.

–डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..