नवीन लेखन...

जरा याद करो कुर्बानी- परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन करमसिंग

23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले. पहिला हल्ला तोफेच्या धडका देत झाला. तो करमसिंग यांच्या गस्ती पहारा ठाण्यावर. पाकिस्तानच्या तोफा अचूक मारा करत पुढे पुढे सरसावत होत्या. भारतीय ठाण्यांचे जवळ जवळ सर्वच खंदक (बंकर्स) उद्‌ध्वस्त झाले. शीख रेजिमेंटचे बांके जवान “सौ सौ निहाल सत श्री अकाल’ची रणगर्जना करत गुरू गोविंदसिंगांच्या “पंजपाऱ्यांच्या ‘आविर्भावात लढा देत गुरूचरणी मोक्षव्रत विसावत होते. सर्व रक्ताच्या अर्घ्याने लालीलाल झालेल्या खंदकाचा (बंकर) मुआयना करत करमसिंग एका खंदकातून दुसऱ्या खंदकात तोफांचा भडिमार सहन करत, गनिमाला प्रत्युत्तर देत जखमी जवानांचा हौसला बुलंद करत लढत लढत शत्रूला भिडले. प्रतिहल्ला करत असताना त्यांच्या जवळचा दारूगोळा संपताच त्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण करत आपल्या संगिनीने (बेनट) पाकी सैनिकांना भोसकत पिटाळून लावले. पाठ दाखवून पाकी रेंजर पळत सुटले. करमसिंग यांच्या अजोड पराक्रमाने पाकिस्तानी फौजेचे मनसुबे ढासळले. त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करून कॅप्टन पदावर त्यांची पदोन्नती केली. त्यांनी 60 व्या वर्षी पंजाबात आपल्या गावी चिरनिद्रा घेतली.

कै. कॅप्टन करमसिंग यांच्या पराक्रमासमोर आदर्श होता तो नायक जदुनाथसिंह ह्या बहाद्दूर नायकाचा. छातीचा कोट करून मृत्यूस आव्हान देणारा परमवीर म्हणजे नायक जदुनाथसिंह. राजपूत बटालियनचा हा निडर योद्धा.

पूंछ व नौशेरा ही काश्मीकरमधील सामरीकदृष्ट्या महत्त्वाची दोन ठाणी. ही ठाणी गनिमांच्या ताब्यात गेल्यास शत्रू श्रीनगरच्या अंतरंगात घुसेल हे जाणून दक्षिणेतल्या जम्मू भागातून व उत्तरेकडील उरी भागातून पाकिस्तानी सैन्याला घेरण्याची योजना ठरली. तुटपुंज्या फौज फाट्यासह शत्रूच्या वीस हजार सैन्याला थोपवून धरणारा चक्रव्यूह समान अभिमन्यू पराक्रम होता. ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान ह्यांनी झांगर- नौशेरा मार्गे कूच करायची योजना आखली.

पाकिस्तानी फौजांचे लक्ष नौशेरा जवळच्या ताडून घर या टेकड्यांकडे वळले. कारण नौशेरावर लक्ष ठेवण्यास या टेकड्या कारणीभूत होत्या. या टेकडीवर असलेल्या राजपूत बटालियनने तोकड्या शिबंदीसह पाकिस्तानच्या फ्रंटिअर फोर्सच्या नाकीनऊ आणले. पराभवाने खचलेल्या पाकी फौजांनी स्वट व दीर या भारतीय ठाण्यावर तोफांचा भडीमार सुरू केला. पठाणी रेजीमेंटच्या वीस हजार पठाणांनी अंधाधूंद मारा चौफेर बाजूनी होत असतानाही राजपूत बटालियन मुरारबाजीच्या त्वेषाने लढत होती.

6 फेब्रुवारी 1948 रोजी गस्ती पहारा चौकी ठाणे 2वर तैनात असलेल्या नाईक जटुनापसिंह केवळ नऊ साथीदारांसह हा किल्ला लढवताना आपल्या धिरोदत्त व संयमी नेतृत्वाने पहिला हल्ला नामोहरम को. चिडून दुसरा हल्ला पाकने चढविला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी नायक जदुनाथसिंह मोर्चे बांधणी करत असताना सेक्श्नचे सहकारी जायबंदी होत पडत होते. या घनघोर परिस्थितीमध्ये जदुनाथसिंह मृत्यूला आव्हान देत प्रत्येक जखमी सहकाऱ्याजवळ जाऊन त्यांना प्रोत्साहित करत होते. जदुनाथसिंह यांचा उजवा हात निकामी होताच “जय एकलिंग महाराज, राजपूत आयो’ ही आरोळी ठोकत घायाळ सिंहाप्रमाणे हा नरशार्दुल गनिमांवर तुटून पडला. पाकिस्तानीची एक पलटण गारद करत बंदूकीच्या एका गोळीला घायाळ होत जदुनाथसिंह धाराशाही झाले.

टीथवालच्या रणसंग्रामात आणखीन एक राजपूत योद्‌ध्याने राणा प्रतापी पराक्रमी वारसा जपत परमवीरचक्र मिळवले व मोक्षास गेला. तो म्हणजे कंपनी हवालदार मेजर पिरूसिंह. पाकिस्तानच्या राक्षसी प्रचंड अत्याधुनिक शस्त्रांच्या प्रहाराला व एम.जी.एम. (मिडीयम मशिन गन) च्या वर्षावाला न जुमानता, खंदकावरून हातगोळ्यांचा (हॅंड ग्रेनेड) मारा होत असताना या अस्मानी सुलतानी हल्ल्याला थोपवून धरण्याची कामगिरी पिरूसिंह यांच्यावर सोपवण्यात आली होती. राजस्थानमधील झुंजझुनु जिल्ह्यातील बेरी गावचा हा बाका लढवय्या शत्रू पक्षावर बेफाम वनराजाप्रमाणे तुटून पडला. अर्धी पलटण धाराशाही पडलेली, अनेक सहकारी जांयबंदी झालेले पण हा नरोत्तम न डगमगता “वन मॅन आर्मी’ चे रौद्ररूप घेत आपल्या संगिनीने पाकिस्तानी सैनिकांना भोसकत खच्ची करत प्राणाची पर्वा न करता पाकिस्तानी हद्दीत घुसला, संबंध शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडत असतानाही शत्रूच्या खंदकात चेवाने सरसावत अनेक खंदक (बंकर्स) ओलांडत असताना पिरूसिंह यांच्या डोक्यााचा शत्रूच्या एका गोळीने भेद केला आणि घात झाला. त्याही क्षणी पिरूसिंह यांनी पाकिस्तानी मशीनगधारी अधिकाऱ्याला यमसदनास पाठविले. मृत्यू पिरूसिंह यांना मिठी मारत असताना त्यांनी एक हात बॉम्ब (हॅंड ग्रेनेड) फेकून शत्रूचे खंदक उद्‌ध्वस्त केले. या घटोत्कची पराक्रमापुढे पाकी सैनिक हतबल झाले. पळून गेले. मातृभूमीच्या कुशीत चिरनिद्रा घेणाऱ्या या परमवीराचा त्याग पराक्रम पाहणाऱ्या बटालीयन कमांडरने धन्योद्‌गार काढले. केसरीया करणारा, असंख्य जखमा अंगावर झेलत रणक्षेत्र गाजवणार हा तर आमचा “आधुनिक राशसंग्राम’!

हे युद्ध ऑक्टोणबर 1947 ते डिसेंबर 1948पर्यंत म्हणजे चौदा महिने चालले. टोळीवाल्या लुटारू सैन्याने लूट घेऊन पाकिस्तानला पलायन केले. अनेक स्त्रिया पळविल्या; पण त्यामुळे भारताचा फायदा असा झाला की, बेसावध असणाऱ्या, हल्ला होणार याची पूर्वसूचना न मिळालेल्या हिंदुस्थानी सैन्याला जमवाजमव करण्यास व प्रतिचढाई करण्यास अवसर मिळाला. साधनसामग्री, शिबंदी रणक्षेत्रात पोहोचण्यास अवधी मिळून मोर्चा बांधणी त्वरेने करता आली.

पाकिस्तान आम्ही काश्मीमर हिंदूंच्या जाचातून मुक्त करणारे मुक्तिदाते आहोत’ म्हणत काश्मी्रमध्ये घुसले; पण या पाकी फौजेने काश्मिकरी जनतेवर अत्याचार करताच काश्मी्र भारताच्या जवळ आले. पाकिस्तानचा खोटा प्रचार उघडकीस आला; परंतु युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात बलुचिस्तान, गीलगीट इत्यादी काश्मीकरच्या भागावर जबरदस्ती हस्तगत केला. ह्या भागाला पाकिस्तान आझाद काश्मीकर’ म्हणतात. आणिआपण पाकव्याप्त (पाकिस्तानी ऑक्युीपाईड काश्मीार- पीओके) म्हणतो. हे प्रकरण संयुक्त राष्ट्रसंघात (युनायटेड नेशन) मध्ये प्रविष्ट असून 31 डिसेंबर 1948 रोजी खरे तर युद्धबंदी जाहीर करत दोन्ही देशाने आपले सैन्य पूर्वीप्रमाणे होते तेथे मागे घ्यावे हे ठरले. भारताने ही सूचना मानली पण पाकने नाही. प्रत्यक्ष ताबारेषेपलीकडून काश्मीयरी जनतेवर दहशतवादी सोडून अत्याचार करणे, भारतीय सैन्यावर सतत सीमे पलीकडून हल्ले करणे, अशांतता व काश्मी रमध्ये अस्थैर्य निर्माण करणे हा छुप्या युद्धाचा (कोल्ड वॉर) आधार घेत आजही पाकिस्तान हे क्रूर अघोरी कर्म करत आहे गेली 70 वर्षे.

सैन्याचा पराक्रम, भारतीय वायुदलाची धुरंधर प्रतिहल्ल्याची धडाडी, कुशल प्रभावी नेतृत्व, सामान्य जनतेने सैन्याला दिलेली स्वयंस्फूर्त मदत या जोरावरच भारतीय सैन्याने पाकिस्तानी फौजेला खदाडले. दुर्दैवाने 1/3 काश्मीसर मात्र पाकच्या ताब्यात गेला, हे शल्या मात्र खुपत आहे. काश्मीतरचे हे बळजबरीचे व बेकायदेशीर विभाजन घडून येण्यास कारर एक आंतरराष्ट्रीय षडयंत्रच म्हटले पाहिजे. भारत हा देश शांत राहिला तर तो महासत्ता बनू शकतो म्हणून या देशाच्या शिरावर एक टांगती तलवार लटकवत ठेवायची आणिवर परत शहाजोगपणा करत भारत-पाक अल्पजीवी तह घडवून आणायचे हा महासत्तांचा जीवघेणा खेळ चालू आहे. ठरलेले होते दोन्ही देशांनी सैन्य मागे घेऊन पूर्वस्थिती बहाल करायची पणही अट भारतानेच मानली तर पाकिस्तानने सैन्य मागे न घेता ह्या राष्ट्रसंघाच्या अटीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. महासत्तांनी तेव्हा पाकिस्तानला खडे बोल सुनावून अट मान्य करून घेणे त्यांचे मध्यस्थ म्हणून कर्तव्य होते. उलट आजही अमेरिका पाकची शस्त्रे, पैसा सवलती देऊन लाड पुरवत आहे. ही शस्त्रास्त्रे भारताविरुद्ध वापरून पाक शेफारत आहे.

या चौदा महिन्यांच्या रखडत गेलेल्या युद्धामुळे काही बाबींचा उलगडा होत सैनिकी व राजकीय धडे आपणास मिळाले. एका बाजूला युद्ध चालत असताना दुसऱ्या बाजूस जागतिक राष्ट्रसंघ शांततेचे प्रयत्न करण्यात गुंतले होते. या युद्धाने ही बाब स्पष्ट केली की पाकिस्तान आपले नापाक इरादे पूर्ण करण्याकरिता व युद्धात सफलता मिळवण्याकरिता जात, धर्म, वंश यांची दुहाई देत जिहादचा पुकारा करत हीन प्रवृत्तीने हल्ले करत राहणार. दहशतवादाच्या पडद्याआड पाकिस्तान भारतात सतत अशांतता माजवत आर्थिक युद्ध लादत राहणार. या युद्धामध्ये सैन्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे-

युद्धातील अंतिम लक्ष व सफलता मिळवण्यासाठी प्रथम नियोजन करून कार्यवाही प्रथम ठरवून त्यावर हुकूम योजना आखल्यास शत्रू नामोहरम होतो.शत्रूला हालचाली करत फसवत धोक्यालत घातले तर वेळेची बचत होते. प्रत्येक क्षण हा युद्धामध्ये महत्त्वाचा व मोलाचा असतो. या युद्धात वायुदलाने श्रीनगर विमानतळावर वेळेत पोहोचल्याने सैन्याचे नुकसान न होता भारतीय सेनेचा विजय निश्चि त झाला.सेना दलाच्या भूदल, वायुदल व नौदल यांच्यातील सहयोगाचे सामंजस्य फार महत्त्वाची बाब. नौसेनेने या युद्धात समुद्रीमार्गाने नाकेबंदी केली. वायुदलाने दिवसाला पन्नास पन्नास उड्डाणे करून भूदलास रणक्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत उतरवून विजयावर शिक्कामोर्तब केले.सैन्याच्या गुप्तवार्ता विभागाची गरज अधोरेखित झाली. शत्रूच्या हालचाली टिपणे हे योजना ठरवताना महत्त्वाचे आहे. हे सर्वांच्या लक्षात आले.सैनिक आपल्या इतिहासाची गतकालीन परंपरा जीवाचेही मोल देऊन करतात. त्यांना फक्त मानसिक व नैतिक पाठबळ लागते.भौगोलिक परिस्थितीला पूरक गणवेश, शस्त्रसाठा, दारूगोळा तयार असणे हा वस्तुपाठ सैन्य शिकले.जर भारताने युद्धबंदी मान्य केली नसती तर आज जी काश्मीुर समस्या जटील होऊन बसली आहे ती झाली नसती व काश्मीार अखंड, एकसंध राहिला असता म्हणून कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने उद्दिष्ट साध्य होईस्तोवर तह करू नये.या युद्धाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली ती म्हणजे आपल्या समस्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मांडून सोडवता येत नाहीत अन्यथा युनोने पाकवर दडपण आणून काश्मींर खाली करून घेतले असते.

हे सर्व धडे भारतीय सैन्याला व राजकारण्यांना मिळाले. काही प्रश्न समस्या सुटल्या असल्या तरी काश्मीलरची समस्या उग्र रूप धारण करत आहे. सांप्रतकाळी पाकिस्तानने त्याला दहशतवादाची फोडणी देऊन काश्मीूरच्या निमित्ताने भारतीय आर्थिक, सामाजिक जीवन ढवळून काढले आहे. निर्णायक युद्धासाठी बहुधा भारताला सर्व सामर्थ्यानिशी सज्ज, सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे.अमेरिका,रशिया, ब्रिटन यांच्यावर विसंबून राहणे बंद होऊन आपण आत्मनिर्भर कसे होऊ हे समजून घेऊन पावले टाकली पाहिजेत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..