दररोजच्या जीवनात आपण ‘जांभई’ देतांना इतरांना पाहतो. तसेच ‘जांभई’चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. ‘जांभई’ येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही ‘जांभई’ भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई’ ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय. ‘जांभई’ का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले. कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मात्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शणास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही.मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते.
जांभईच्या शास्त्रीय अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक ज्येष्ठांचे निरीक्षण केले. कुटुंबातील सदस्यांमध्ये जांभई ही तुलनेने मित्र किंवा इतर घटकांपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे यातून दिसून आले. नातेवाइकांत हे प्रमाण दहामध्ये आठ, तर अनोळखींमध्ये ते दहात केवळ एक असल्याचे आढळून आले. दुसरीकडे जांभई देण्यास उशीर झाला तर ती अधिक लांबण्याची शक्यता असते. हे परिचित व अपरिचित दोन्ही व्यक्तींबाबत घडू शकते. या प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली. यात राष्ट्रीयत्व, त्वचेचा रंग, भिन्न सांस्कृतिक सवई, सहभागी व्यक्तीचे वय, लिंग. याशिवाय दोन व्यक्तींमधील नातेसंबंध हे ते घटक असल्याचे संशोधन प्रकल्पाच्या प्रोफेसर एलिझाबेटा पालागी यांनी म्हटले आहे. मुलांमध्ये जांभईची ही संसर्गजन्य प्रक्रिया पहिल्या पाच वर्षांपर्यंत विकसित होत नाही. त्यामागे भावना हे कारण सांगण्यात आले आहे. इतरांच्या भावना नीटपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसते. त्यामुळे मुले या नियमाला अपवाद ठरली असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. परिचित व्यक्तीच्या सहवासात जांभई येते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीला जांभई देतानादेखील जांभई येण्याची वृत्ती होते किंवा त्याला टाळण्यात येते. या शास्त्रज्ञ सामाजिक सहानुभूतीची संकल्पना देतात. ही बाबदेखील संशोधनातून आढळून आली आहे. 480 जांभई स्पर्धेतून अभ्यास करण्यात आला. हा संशोधन प्रकल्प एक वर्ष चालला. त्यात 109 ज्येष्ठांना सहभागी करून घेण्यात आले होते. 04 वर्षांपर्यंत मुलांमध्ये मोठ्या माणसांसारखा हा संसर्ग आढळून येत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ :- marathi.webdunia.com
Leave a Reply