जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस.
युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची २१ मार्च १९९९ रोजी पॅरिस परिषदेत या दिवसाची घोषणा केली. तेव्हांपासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. यंदाचे वर्ष तब्लिसी (जॉर्जिया)येथील कवी निकोलस बाजातशविली (१८१७-१८४४) यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांनी ३२ पेक्षा अधिक काव्यरचना केल्या. त्यात बहुतांश प्रेमकविता होत्या. मानवी भावना प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले होते की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री मा. संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात –
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
William Wordsworth ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता.
सर्व कवी, कवीयित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply