आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, फास्ट फूड व बेकरीचे पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये व मुलांमध्ये वाढलेले दिसते,बरेच पालक मुलांना टिफीन मध्ये जंक फूड देतात व त्यामुळे काय होते:-
१. लठ पणा वाढतो
२. रक्तदाब वाढू शकतो
३. याचा परिणाम किडनी वर होऊ शकतो
४. आजकल काही तरुण मंडळी व्यायाम करतात,जिममध्ये जातात कारण त्यांना आपली शरीरयष्टी बलदंड करावयाची असते,चांगली गोस्ट आहे.
परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रोटिन्स सप्लिमेंट व स्टिरॉइड्स चे सेवन करतात.याचा परिणाम किडनी निकामी होण्यावर बेतू शकतो
५. किडनी निकामी होण्याचे मुख्य कारण — लठ्ठपणा.
६. वजन वाढल्यामुळे किडनीवर ताण पडतो
७. त्यामुळे किडनीविषयक समस्या निर्माण होतात
८. कालांतराने किडनीचे कार्यक्षमता कमी होते
९. मधुमेह आटोक्यात ठेवला नाही तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो
१०. गेल्या सात आठ वर्षात लठ्ठपणा व किडनीच्या समस्यांचं प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येते
११. याची प्रमुख कारणे –
व्यायामाचा अभाव
असंतुलित आहार
सुदृढ जीवनशैलीचा अभाव
जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण
तेव्हा किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे.किडनी शिवाय आपण जगू शकत नाही.तीला जपा.जपणे तुमच्या हातात आहे.आपल्या किडनिज नॉर्मल आहेत कि नाही त्याची तपासणी करू शकता
प्रा वसंत पाटील
9371629799
९ मार्च,२०१७
Leave a Reply