नवीन लेखन...

जागतिक हवामान दिन

आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.

हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

२०१० ते २०१३ या काळात अत्याधिक हवामानबदलाच्या अनेक घडामोडी घडून आल्या. या घडामोडींनुसार, २०१० ते २०११ हे वर्ष गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०१० ते २०१३ ही अत्याधिक हिमवादळे आणि थंडीची वर्षे ठरली. २०१० ते २०१३ हा अत्याधिक पावसाचे व वादळांचा कालखंड ठरला. त्याचबरोबर भारतात दिवस आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. मान्सून लहरी बनला. जागतिक हवामानातील या बदलांची आपण वेळीच दखल घेतली नाही आणि त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर कोणते भयावह संकट ओढवेल.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. रामचंद्र साबळे / इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..