नवीन लेखन...

‘जिंगल म्हणजे नक्की काय?’

‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात. जिंगल्स अवघ्या एका मीटिंगमध्ये ठरतात. क्लायंट किंवा एजन्सीला नेमकं काय हवंय, हे या बैठकीत सांगितलं जातं. रेडिओसाठी जिंगल असेल तर बैठकीत त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा होते. हे सारं ठरलं की एजन्सीची स्वत:ची एक ‘लँग्वेज कमिटी’ असते. जिंगल कोणत्या भाषेत करायचीय, हे तीत ठरतं. मग त्या भाषेत जिंगल लिहून घेऊन ती क्लायंटकडून आधी संमत करून घेतली जाते. तिला एकदा का हिरवा कंदील मिळाला, की मग क्लायंटला इतरही भाषेत ती करायची असल्यास त्या- त्या भाषेतल्या संहिता लेखकाकडे ती जिंगल पाठविली जाते. मूळ जिंगलचा तिला दिल्या गेलेल्या संगीताच्या अनुषंगानेच दुसऱ्या भाषेत अनुवाद करावा लागतो. जिंगलचं संगीत कोणी करावं, याचाही विचार होतो. पाश्चात्य धर्तीचे असल्यास लुईस बॅक्स्-लेझली.. भारतीय संगीतात करायचं झाल्यास वनराज भाटिया, वैद्यनाथन, अशोक पत्की वगैरे नावं पुढे येतात. अमुक अमुक गायकाला सांग, स्टुडिओ आरक्षण, वाद्यवादकांना बोलवा, वगैरे गोष्टी संगीतकारावरच सोपवल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्टुडिओत पोहोचल्यावर संगीतकाराच्या हाती जिंगलचं स्क्रिप्ट पडतं. त्यात जिंगलचा कालावधी किती? गायक कोण? व्हॉइस ओव्हर कोण, वगैरे लिहिलेलं असतं. समजा, सकाळी दहा वाजता स्टुडिओत पोहोचलो, की आमच्या हाती एक-दीड तास असतो. त्या वेळात जिंगलला ‘चाल’ लावणे, ती एजन्सीकडून संमत करून घेणे आणि ट्रॅक तयार करणे वगैरे आटोपायचं असतं. कारण दीड तासाने गायक येणार असतो. त्याआधी ‘ट्रॅक’ तयार पाहिजे. सिंथेसायजर वगैरे नव्हतं त्याकाळी वादकांसमवेत आयत्या वेळी तिथल्या तिथं काम करावं लागायचं. तबला, ढोलक, कोंगो, बोंगो, फ्लूट, सितार, स्पॅनिश अशी सर्वसाधारण वाद्यं असत. पुढे काळ बदलत गेला तसं फक्त सिंथेसायजर व रिदम बॉक्सवर काम होऊ लागलं. स्क्रिप्ट हातात पडल्यावर त्या जिंगल्सच्या चार-पाच ओळी २० किंवा ३० सेकंदांत बसवायच्या म्हणजे त्याचा ‘टेम्पो’ काय असावा, उत्पादनाचं नाव श्रोते/ दर्शक यांच्या मनीमानसी ठसेल अशी सुरावट कशी करावी, याचा विचार संगीतकाराला करावा लागतो. एका हातात स्टॉपवॉच व दुसऱ्या हाताने पेटी किंवा पियानोवर जिंगलला चाल लावण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक जिंगलच्या वेळी त्यात नावीन्य काय आणता येईल, याचाही विचार करावा लागतो. कारण एखाद् दुसरी नोटही दुसऱ्या कोणत्या जिंगलसारखी वाटली तर एजन्सीवाले ती बदलायला सांगतात. म्हणजे सतत डोळे आणि कान उघडे ठेवून काम करावं लागतं.

गायक (किंवा गायिका) आला की ध्वनिमुद्रण सुरू होतं. बरं, त्याला त्या जिंगलची फक्त चालच तेवढी गायची नसते, तर त्यात ‘नाटय़’ही आणायचं असतं. जिंगलच्या क्षेत्रात विनय मांडके, सुषमा श्रेष्ठ (पूर्णिमा), प्रीती सागर ही दादा मंडळी आहेत. रेडिओवर जिंगल ऐकली तरी त्यातल्या ओतप्रोत भावनांनी ती इतकी जिवंत वाटायला हवी, की ऐकणाऱ्याला जबरदस्त इच्छा व्हायला हवी, की ही वस्तू आत्ताच्या आत्ता जाऊन आपण विकत घेतली पाहिजे. यालाच जाहिरातीचं ‘मार्केटिंग’ म्हणतात. चॉकलेटची जाहिरात असेल तर मुलाने आई-वडिलांकडे हट्ट धरलाच पाहिजे, किंवा भांडी घासण्याचा साबण वा लिक्विड असेल तर बाईला वाटलंच पाहिजे, की आजच बाजारात जाऊन मी ते घेऊन यावं. माझ्या हातांना त्यानं आराम मिळेल.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- लोकसत्ता / मा.अशोक पत्की

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..