नवीन लेखन...

जिवनसाथी



खरं तर नावातंच खुप काही आहे. अखंड़ जिवनभर जो आपल्याला साथ देईल किंवा देवु शकतो अशी व्यक्ती म्हणजे जिवनसाथी. आज प्रत्येकाला एक चांगला जिवनसाथी हवा आहे. मग ती मुलगा असो किंवा मुलगी. ज्यावेळी जिवनसाथी निवड़ण्याची वेळ येते किंवा आपल्या लग्नाची वेळ येते तेव्हा आपला जिवनसाथी कसा असावा हे आपण ठरवुन ठेवलेलं असतं. तो दिसायला सुंदर असावा, त्याला चांगली नोकरी असावी, चांगला पगार असावा, तो निर्व्यसनी असावा, समाजात त्याला मान असावा अशा खुप मोठ-मोठ्या अपेक्षा आपण केलेल्या असतात. मुलीबद्दलच्याही आपल्या अशाच अपेक्षा असतात. ति दिसायला खुप सुंदर असावी अगदी ऐश्वर्याराय पण फिकी पड़ेल ईतकी, चांगली शिकलेली असावी, घरात सगळ्यांशी मिळुन मिसळुन घेणारी असावी, संस्कारी असावी अशा अपेक्षा मुलाने ठेवलेल्या असतात. अपेक्षा मुला-मुलींच्या जरी खुप मोठ्या असल्या तरी यापैकी बोटावर मोजण्याईतपतंच खाञीस उतरतात. त्याला कारणंही तशीच आहेत. दुसर्‍याकड़ुन आपण खुप मोठ्या अपेक्षा ठेवतो पण आपण स्वतः तसे आहोत का ते पाहत नाही. मुलगा असेल तर मुलीबद्दलच्या मोठ्या अपेक्षा असतात पण मुलीच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची पुर्तता आपण करतो का तितके कपँबल आपण आहोत का? हा तो विचार करत नाही. स्वतः १० वी फेल असलो तरी चालेल पण मुलगी कमीत-कमी १२ वी पाहीजे, स्वतः व्यसनी असलो तरी चालेल पण मुलगी सुंदर हवी, आपलं कुणाबरोबर नाही जमलं तरी चालेल पण ति मन मिळावु असावी सगळ्यांशी तिने जुळतं घ्यावं मुलींच्याही अशाच काही अपेक्षा असतात. जर काँलेज लाईफ तिने अनुभवलं असेल तर सर्वप्रथम तो दिसायला सुंदर असावा अगदी सलमान खान, २०-२५ हजाराची त्याला नोकरी असावी, त्याच्या घरात फार माणसं नकोत, सासु-सासरे, दिर तर अजिबात नकोत संसार अगदी दोघांचाच हवा जसा राजा-राणीचा. नवरा

बिचारा भोळाभाबड़ा असावा आपण सांगु तसं त्याने
करावं. त्याने पण

काँलेज केलं असेल तर लग्नानंतर त्याच्या फारशा मैञीणी नसाव्यात.आपले ४ बाँयफ्रेंड़ झाले असले तरी चालतील.
खरं तर मुलगा असो वा मुलगी दोघांच्याही अपेक्षा फार असतात पण ना मुलगा मुलीच्या ना मुलगी मुलाच्या खाञीत उतरत नाही. दोघांचाही नेहमी अपेक्षाभंगच होतो. कारण बिफोर आणी आफ्टर मँरेज लाईफ यामध्ये खुप फरक आहे. बिफोर मँरेज लाईफमध्ये आपण दिल का राजा असतो. आपलं मन सांगेल तसं आपण करतो पण आफ्टर मँरेज लाईफमध्ये आपल्या जबाबदार्‍या खुप वाढ़लेल्या असतात. योग्य जिवनसाथी मिळणं एक भाग्याची गोष्ट आहे. संसार म्हणजे काही दोन दिवसाचा खेळ नसतो कोणालाही आणलं आणि मांड़ला संसार. चांगला संसार करण्यासाठी दोघांनीही विवाह नावाच्या पविञ बंधनात अड़कावं लागतं, ऐकमेकांना समजुन घ्यावं लागतं, ऐकमेकांवर खुप प्रेम करावं लागतं तेव्हाच तो संसार सुखी होतो. आजच्या मुला-मुलींना लग्न म्हणजे बंधन वाटतं ते बंधन आहे पण एक पविञ बंधन आहे आणि या बंधनात प्रत्येकाला एक ना एक दिवस अड़कावंच लागतं. ज्यांना कोणाला लग्न म्हणजे बंधन वाटत असेल त्याने या फंदात पड़ुच नये कारण लग्नाअगोदरंच एखादा इतका निगेटिव्ह असेल तर पुढ़े फार कठीण अवस्था असेल. आपली मुलं ही फाँरेन कल्चरला जास्त महत्व देतात याला कारण म्हणजे आपले वेगवेगळे चँनेल्स या चँनेल्सवरती जे पाहीलं जातं तसंच ही मुलं करतात. मग ते चांगलं असो वा वाईट करायचं म्हणजे करायचं. परदेशातले नट-नटी सोड़ा पण आपल्या देशातले नट नटी बघा यांच्याकड़ुन आपली लहान-लहान मुलं काय शिकणार? आजच्या हिंदी सिनेमांमधुन आपण काय शिकु शकतो? आहे काही शिकण्यासारखं पुर्वी सिनेमा दाखवले जायचे त्याच्यातुन खुप काही शिकण्यासारखं असायचं आज सलमान खानने फाटकी पँट घातली तर आपला मुलगा पँड़ फाटली नसेल तरी फाड़तो आणि घालतो का तर ती फँशन आहे. मल्लीकाने जर अर्धनग्नवस्थेतील कपड़े घातले तर आपली तरुणी तशेच कपड़े घालुन फिरते खरं तर हे सेलीब्रिटी म्हणजे आजच्या पिढ़ीचे प्रेरणास्थान आहेत प
आज यांच्यामुळेच तरुण पिढ़ी भरकटत चालली आहे.खरं तर ते तरी काय करणार? पोटासाठी त्यांना ते करावं लागतं असं म्हणतात ईतकं का मोठं असतं यांच पोट ज्याच्यासाठी त्यांना आपली ईज्जत वेशीवर टांगावी लागते. यात या सेलीब्रिटींची काहीच चुकी नाही कारण सिनेमा बनवनार्‍यालाच जर लोकांना हे दाखवायचं असेल तर ते तरी काय करणार. जितके पण फिल्म ड़ायरेक्टर, प्रोड़्यसर आहेत त्यांना मी विनंती करेन की, सिनेमा असा बनवा कि लोकांना काहीतरी त्याच्यातुन शिकता येईल जसे हिंदी मधील बागबान मराठी मधील चिमणीपाखरं. बागबान तर मी स्वतः ३ ते ४ वेळा पाहीला आहे. ज्याने कोणी हा सिनेमा मनापासुन पाहीला असेल आणी काहीतरी यातुन घेतलं असेल ती व्यक्ती आपल्या आई-वड़िलांचे कधीच हाल करणार नाही याउलट तो त्यांची सेवाच करील अर्थात आई-वड़ीलांचंही कार्य तसं हवं. आणखी चिमणीपाखरं जर कोणी पाहीला असेल तर खुप व्यसन करणाराही व्यसन करणं सोड़ुन देईल.कारण पत्नीच्या द्रुष्टीने पती किती महत्वाचा असतो, तो नसताना तिला किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच जर का पत्नी नसेल तर आपल्या मुलाबालांचे काय हाल होतात हेही त्यात दिसुन येतं म्हणजेच सामान्य जिवन जगताना पती-पत्नी ऐकमेकांना किती महत्वाच्या असतात हे त्यातुन स्पष्ट होतं. सिनेमांबरोबरंच मराठी हिंदी सरिअलपण खुप चांगल्या आहेत. सामान्य लाईफच्या द्रुष्टीने या गोजिरवाण्या घरात, चार दिवस सासुचे, कुंकु, पिंजरा, आणि विशेषकरुन काँलेज तरुण-तरुणींसाठी माझीया प्रियाला प्रित कळेना या कार्यक्रमामध्येतर शमिका आणि अभिजीतचं

ऐकमेकांवर असणारं प्रेम, त्यांचा ऐकमेकांवर असणारा विश्वास, त्यांची अंड़रस्टँड़ींग, मनमिळावुपणा सारं एकदम छान दाखवलं आहे. हा कार्यक्रम बघुन प्रत्येक मुलाला आपली मैञीण हि

शमिकासारखीच असावी तिच्याइतकिच ती समजुतदार
सावी आणि प्रत्येक मुलीला आपला जोड़ीदार अभिजीतसारखाच असावा किंबहुना तो अभिजितंच असावा असं वाटतं कारण; या कँरेक्टरमध्ये एवढ़ं काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, कोणीही मुलगी त्याच्या प्रेमात पड़ेल. ह्या कार्यक्रमाबद्दल एवढ़ं सागण्याचा हेतु म्हणजे जवळ-जवळ सगळेच काँलेज स्टयुड़ंट हा कार्यक्रम पहात असतील विशेष करुन मुली तर अशा कार्यक्रमांमधुन खुप काही शिकण्यासारखं असतं ते आत्मसात करा. कोणत्यावेळी मुलाने प्रेमात पड़ावं आणि कोणत्यावेळी मुलीने प्रेमात पड़ाव ह्याला खरोखर एक वेळ आहे आणि त्यावेळेतंच त्यांनी पड़ावं.आज आपल्या घरातुन प्रेमविवाहाला विरोध असल्याचा दिसुन येतो कारण त्याला कारणंही तशीच आहेत. एखादा ड़्रेस बदलावा तसे आपण मिञ मैञीणी बदलत असतो.कारण आजच्या तरुण-तरुणींचे विचार म्हणजे ग्रेट आहेत.आपली टोटल जिवनशैली ही आपल्या संस्क्रतीवर अवलंबुन आहे. पण आजच्या पिढ़ीला संस्क्रती म्हणजे काय? या शब्दाचा अर्थच त्यांना महित नसेल, कोणाला तुकारामांचा किंवा माउलींचा एखादा अभंग म्हणायला लावलात तर काय अवस्था होते बघा. कदाचित आजची मुलं तुम्हालाच उलट विचारतील कोण तुकाराम, कोण माउली? याउलट शिला, मुन्नीचं गाणं म्हणायला सांगितलंत तर ते तोंड़पाठ असेल.

— प्रमोद पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..