नवीन लेखन...

जीवन

जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत  चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं लागतो. निसर्गाचे ऋण फेडावे ते कमीच. मनुष्य जगात रिकाम्या हाताने येतो व रिकाम्या हाताने जगाला निरोप देतो. पण मागे ठेऊन जातो त्या त्याच्यासोबत जुळलेल्या त्याच्या आठवणी,त्याचे नातेसंबंध,त्याचे कर्तृत्व, त्याने घडवून आणलेला बदल इत्यादी.जीवन अस्तित्वात आहे तर मृत्यू ही अस्तित्वात आहे. जे आज आहे ते उद्या नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे.जीवनातील आनंद हेच एक निरंतर सत्य आहे.

हे जग फार सुंदर आहे.या सुंदर जगाला बघण्यासाठी मानवाला सुंदर डोळे आणि मन ही निसर्गाने दिले आहे.पण ही सुंदरता बघण्याचा प्रयत्न फक्त त्यालाच करायचा आहे.मानवाने स्वतःवर व इतरांवर प्रेम केलं तर जीवनातील आनंदाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो.शेवटी सुख,शांती व समाधान हेच जीवन जगण्याचे ध्येय असावे.

— प्रा. हितेशकुमार एस. पटले

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 17 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..