श्रीज्ञानेश्वरादी संतकृत ‘ख-या भक्ती’ बाबत व ‘ख-या देवाचे’ दर्शनाबाबत मार्गदर्शन करणारा एक स्वधर्मग्रंथ |
‘देव पहावयासी गेलो| तेथे देवची होऊनी ठेलो || हा अभंग अनुभवण्यास उध्यूत करणारा एक स्वधर्मग्रंथ |
नामापरते तत्व नाही; संतानी
केलेल्या सोप्या नामजपाबाबतचे गुह्यप्रगट करुन सांगणारा एक स्वधर्मग्रंथ |
देवाचा नेमका ठावठिकाणा / देव आपल्या शरीरातच राहतो हा सिद्धांत पटवून सांगणारा स्वधर्मग्रंथ |
श्रीसद्गुरूंचे व ते करतात त्या सत्कार्याचे स्वरूप स्पष्ट करणारा एक स्वधर्मग्रंथ |
देवाला आवडणा-या थोर/सात्विक/अव्यभिचारी भक्तीची/ ठायीच बैसून देवाला
एकचित्ताने आळविण्याची रीत सांगणारा एक स्वधर्मग्रंथ |
कर्मयोगाचे/अखंड नामानुसंधानस्वरूप सर्वश्रेष्ठ तपाचे स्वरूप स्पष्ट करणारा एक स्वधर्मग्रंथ |
भागवतधर्माचा पाया रचणारी श्रीज्ञानेश्वरी आचरणात आणण्याची नेमकीरीत शिकविणारा एक स्वधर्मग्रंथ |
परमेश्वर स्वधर्मरक्षणार्थ अवतरतो; आपले व आपल्या स्वधर्माचे स्वरूप स्पष्ट करणारा एक स्वधर्मग्रंथ |
सगुण परमेश्वर व निर्गुण परमेश्वर याबाबत स्वहितकारी प्रबोधन करणारा एक स्वधर्मग्रंथ |
संतकृत एकादशीचे व तीर्थांचे स्वरूप साधार स्पष्ट करणारा एक स्वधर्मग्रंथ.
सकाळी व संध्याकाळी करावयाच्या आध्यात्मिक संध्येचे स्वरूप सांगणारा एक स्वधर्मग्रंथ |
समर्थ श्रीरामदासस्वामी म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रपंच करुन परमार्थचाही लाभ करुन घेणारा भला माणूस’ होण्यासाठीचा सन्मार्ग देणारा एक स्वधर्मग्रंथ |
‘पाठी महर्षी येणे आले | साधकांचे सिद्ध झाले | आत्मविद थोरावले| येणेची पंथे ||
या ओवीत संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरांनी गौरविलेला पंथराज सांगणारा एक स्वधर्मग्रंथ |
‘योगिया साधली जीवनकळा’ या ‘हरिपाठातील’ अभंगचरणात श्रीज्ञानदेवांना अभिप्रेत असलेल्या योगसाधनेची रीत दाखवून देणारा एक स्वधर्मग्रंथ |
‘सोsहं शब्दे मारा केला’ म्हणून ज्यांना ‘विश्वाची ‘अण्वी’ जीवनकला’रुपी आत्मा – ‘विठ्ठल काकुळती आला’ त्या संत नामदेव व जनाबाई या गुरुशिशिष्यांनी केलेल्या सोsहं साधनेची साध्यंत रीत सांगणारा एक छोटेखानी स्वधर्मग्रंथ |
लेखक :- मोक्षनिवासी, सदगुरू समर्थ श्री. गणपत नानाजी हंबीर उर्फ श्री.हंबीर बाबा
प्रकाशक :- प. पु. सदगुरू श्री. सुमंतबापू हंबीर
अध्यक्ष :- विश्वव्यापी मानवधर्म आश्रम, पाटेठाण, ता. दौंड, जि. पुणे
— रामदास नामदेव ढोरमले
Want to buy this book:जीवन कलेची साधना