नवीन लेखन...

जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या

माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .

इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण,
एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा…
आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले ,

“बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?”
त्यावर तो मुलगा उत्तरला ,
“बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?”म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..
“.हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले..
त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.

आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते .त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.

त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते,
पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचाअंग बनून राहिला .

मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचाअंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या…

*Be positive and be happy*

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..