महालेख हे मानव जीवन, प्रभू तयाचे करी संपादनअनेक असती विरामचिन्हे, ठायी ठायी या लेखातुन ।।धृ।।
रम्य काळ तो बालपणीचा, सुखद आरंभ जीवनाचानवे नवे ते मना भावते, जे दिसते ते हवे वाटतेचंचलमन स्वछंद बागडे, स्वल्प विराम पहा चहुकडे ।।१।।
कौमार्यामध्ये ज्ञानपिपासा, देव, विश्व यास्तव जिज्ञासापरंपरा जनरुढी आणिक विज्ञानाच्या उन्नत दिशाया विषयी मनी विविध प्रश्न ते, दिसे मज तिथे प्रश्नचिन्ह ते ।।२।।
यौवनांत मग होई पदार्पण, सुख स्वप्नांचे रंगी जीवनयश कीर्ति, संपदा, सुबत्ता, अन् अर्धांगी जीवनी येताअर्धे जीवन सफल वाटते, अर्धविराम करु वाटे तेथे ।।३।।
प्रौढपणी ये परीपूर्णता, व्यापक बुद्धी अन् प्रगल्भताभले काय अन् बुरे कोणते विचारक्षमता मनास येतेकृतकार्याचे मनन चिंतन, होई मग उद्धारवाची मन ।।४।।
चाहुल वार्ध्यकाचि लागता, महालेखाची भासे सांगताधन, कांचन, कीर्ति अन् कान्त, देऊ ना शकती मना शांततासुखशांतीचा जो अनंत ठेवा, पूर्ण विराम त्या प्रभुपदी घ्यावा ।।५।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply