रुग्णांना चांगल्या आणि स्वस्त दरातील आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने सरकारने स्वस्त औषधांची उपलब्धता आणि अत्यावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारने जेनेरिक औषधांच्या माध्यमातून जनतेसाठी स्वस्त पण दर्जेदार जीवनावश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत.
स्वस्त उपचारांसाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे. या कायद्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधे लिहून देणेही बंधनकारक होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
आज काल आपण सर्वजण विविध माध्यमातून जेनेरिक औषधांविषयी ऐकतो आहोत.
पण काय आहेत ही जेनेरिक औषधे?
खरंच परिणामकारक आहेत का?
कुठे उपलब्ध आहेत?
मी आत्ता घेत असलेल्या औषधांसाठी कोणता जेनेरिक पर्याय उपलब्ध आहेत ?
व ती तुलनेत एवढी स्वस्त कशी?
जेनेरिक औषधे म्हणजे काय?
‘जेनेरिक औषधे’ म्हणजे ब्रॅँडेड नसलेली स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषध व त्याचे ब्रॅण्डेड औषध यात खालील साधम्र्य असते. मुख्य घटक पदार्थ शरीरात शोषले जाण्याचा वेग आणि रक्तातली पातळी औषधाचे डोसेज फॉर्म (उदा. टॅब्लेट, कॅप्सूल, सिरप)
अनेक वर्षांच्या संशोधनातून शोधल्या गेलेल्या फॉर्म्युल्यानुसार औषध तयार केले जाते. दरम्यान, या औषधांचा उत्पादन करण्याचा खर्च जरी कमी असला तरी संशोधनावर झालेला खर्च भरून काढण्यासाठी त्या कंपनीला त्या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी देण्यात येतो, म्हणजेच पेटंट देण्यात येते. या औषधाला कंपनी विशिष्ठ नाव देते, त्यालाच आपण ‘ब्रँडेड औषध’ असे म्हणतो. पेटंटचा कालावधी सात ते वीस वर्षांदरम्यान असतो. या कालावधीनंतर इतर औषध कंपन्या त्या कंपनीचा फॉर्म्युला वापरून व तिच्या परवानगीशिवाय त्याच गुणवत्तेचे औषध वेगळ्या नावाने म्हणजेच जेनेरिक नाव देऊन तयार करू शकतात. हे तयार केलेले औषध म्हणजेच ‘जेनेरिक औषध’ होय.
जेनेरिक औषधांची किंमत कमी का असते?
जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने पेटंटच्या कालावधीत वसूल केलेला असतो. अर्थातच औषध निर्मितीचा खर्चही कमी असल्याने त्याची किंमत मूळ ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी होते. यामुळे नागरिकांनी स्वतःहून जेनेरिक औषधांची मागणी करायला हवी. यामध्ये पैशांचीही बचत आणि उपचारही उच्च दर्जाचा असेल.
उदा. डोकेदुखी, अंगदुखी, ताप यांपासून आराम देणारे ‘पॅरासिटॅमॉल’ नावाचे एक औषध आहे. ‘पॅरासिटॅमॉल’ हे जेनेरिक नाव झाले. तर क्रोसिन, मेटॅसीन, कॅलपोल आदी ब्रँडेड औषधे आहेत. ही जी निरनिराळ्या ब्रँडनेमखाली मिळतात त्यांना ‘ब्रँडेड-जेनेरिक’ असे म्हणतात. भारतात सुमारे ९०० जेनेरिक औषधांपासून बनलेली ६०००० ‘ब्रँडेड-जेनेरिक’ औषधे आज भारतात विकली जातात.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply