नवीन लेखन...

जेष्ठ अभिनेत्री प्रिया राजवंश

प्रिया राजवंश यांचे खरे नाव वीरा सिंह. शालेय शिक्षण सिमल्यातलंच. शाळेत असताना त्यांनी अनेक इंग्रजी नाटकांत अभिनय केला होता. वनविभागात कंजरवेटर म्हणून काम करत असताना प्रिया राजवंश यांच्या वडिलांना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते. प्रिया राजवंश सुद्धा त्यांच्याबरोबर लंडनला गेल्या होती. त्यांचा जन्म १९३७ रोजी सिमला येथे झाला.तेथे गेल्यानंतर त्यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट्स या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला.

चेतन आनंद हे त्यांच्या’हकीकत’ या सिनेमासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता. हिंदी चित्रपटसृष्टीत युद्धपट निर्माण करण्यात चेतनला स्वारस्य होते. त्यामुळे या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून तो विभक्त झाला होता. जीवनातील एकाकीपणामुळे तो बेचैन होता. ‘हकीकत’ हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’ रिलीज झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला. प्रिया राजवंश रातोरात बिग स्टार झाल्या. १९५० मध्ये चेतन आणि देवआनंदने मिळून ‘नवकेतन’ सुरु केली होती. पण ते यश देव आणि नवकेतनच्या नावावर नोंदवले गेले. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने ‘हिमालया फिल्म्स’ सुरु केली. चेतनची एक खास टीम होती, जाल मिस्त्री, कैफी आझमी आणि मदनमोहन ! या टीममध्ये आता प्रिया राजवंश यांचे नाव सामील झाले. चेतनने हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. मात्र त्यांनी केवळ चेतन आनंद यांच्यासोबतच काम करणे पसंत केले. तिने इतर मोठ मोठे बॅनरचे चित्रपटही नाकारले. यामुळे तिच्या सिनेमांची संख्या मोजकीच राहिली. ‘हकीकत’नंतर १९७० मध्ये ‘हीर रांझा’, १९७३ मध्ये ‘हिंदुस्थान की कसम’ आणि ‘हंसते जख्म’, १९७७ मध्ये ‘साहेब बहादुर’, १९८१मध्ये ‘कुदरत’ आणि १९८५मध्ये ‘हाथों की लकीरें’ या सिनेमात प्रिया राजवंश होत्या. ‘हिंदुस्तान की कसम’मध्ये तर प्रिया राजवंश यांची ताहिरा आणि मोहिनी अशी दुहेरी भूमिका होती. प्रिया राजवंश यांचे निधन २७ मार्च २००० रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..