मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे झाला.शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांची कन्या. तर मुनमुन यांच्या मुली रिया सेन आणि रायमा सेन या देखील बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मा. मुनमुन सेन यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८४ मध्ये रिलीज झालेला ‘अंदर बाहर’ हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी ‘मुसाफिर’, ‘मुहब्बत की कसम’, ‘जाल’, ‘शीशा’, ‘प्यार की जीत’, ‘माशुका’, ‘वो फिर आएगी’, ‘100 डेज’, ‘वक्त के बादशाह’, ‘जख्मी रूह’, ‘कुछ तो है’, ‘अपना देश पराए लोग’, ‘पत्थर के इंसान’, ‘बेलगाम’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. मा.मुनमुन सेन आपल्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत. काही सिनेमांमध्ये त्या बिकिनीत झळकल्या आहेत. काही सिनेमांमध्ये त्यांनी बोल्ड सीन्सही दिले आहेत. मुनमुन यांनी आता सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. मा.मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुक लढवली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply