डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते, पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… मा.संभाजी राजे म्हणजे फक्त आणि फक्त “डॉ.काशिनाथ घाणेकर”…रायगडाला जेंव्हा जाग येते मधला त्याचा संभाजी दुसरा कुणीही करू शकणार नाही…अंगकाठी नसली तरी केवळ जरब बसवणारे डोळे, उत्भेदक अभिनय आणि आवाज या हुकमी अस्त्रांवर त्यांचा संभाजी बघताना अंगावर शहारे येत असत., परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार म्हणताना कासावीस झालेला संभाजी अजूनही डोळ्यांपुढून जात नाही… वसंत कानेटकर यांचे‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मराठी रंगभूमीवर आले आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेने ते नाटक कमालीचे गाजले.
कांचन या काशीनाथ घाणेकरांचे “नाथ हा माझा” हे वाचून तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले जाते…गारंबीचा बापू चित्रपट त्यांनी केला होता. चित्रपटाच्या शेवटी विठोबाssss म्हणून त्यांनी जी आर्त साद घातली होती ती आजही तशीच मनात घुमत राहते…तितक्याच आर्ततेने… कुणा एकेकाळी संभाजी आणि “डॉ.काशिनाथ घाणेकर” हे कधीही वेगळं होऊ न शकणार समीकरण होतं…केवळ किस्से ऐकून डॉक्टरांनी अजरामर केलेले संभाजी आजही कधीकधी डोळ्यासमोरून झरझर जातात…कदाचित असेच असतील त्यांचे त्यावेळचे प्रवेश असे सारखे वाटत राहते….आबा ,परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार हा संवाद कानात घुमत राहतो… मधुचंद्र हा राजदत्त दिग्दर्शित एन. दत्ता यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील सगळी गाणी लोकप्रिय झाली. या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर, उमा यांच्या प्रमुख भूमिकाही गाजल्या. अश्रुची झाली फुले हे सुद्धा डॉक्टरांचे गाजलेले नाटक. ‘हे चिंचेचे झाड दिसे मज’ हे मधुचंद्र चित्रपटातील गीत रसिकांनाही मोरपिशी स्पर्श करून गेले. १९७० साली डॉक्टरांचा ‘देवमाणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. डॉक्टरांनी काही हिंदी चित्रपटात कामे केली. “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांचे २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
हे चिंचेचे झाड गाण्याची लिंक
https://www.youtube.com/shared?ci=guwaXT874XI
Leave a Reply