खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे ‘सुप्रीम पिक्चर्स’चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नन्तरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले. खेमचन्दजीची काही गाणी त्यांच्या मृत्युनन्तर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. ‘स्ट्रीट सिंगर’ हा सिनेमा त्यातल्या ‘बाबुल मोरा’ गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्यात ‘लो खा लो मॅडम खाना’ हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते. सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल. कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते. कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी ‘खेमराज’ नावाने संगीत दिले होते. संगीतकार खेमचन्द यांचे निधन १० ऑगस्ट १९५० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : विकिपिडीया
Leave a Reply