नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते ओमर शरीफ

‘डॉक्टर झिव्हॅगो’, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ यासारख्या चित्रपटांवर आपल्या अभिनयाची लक्षणीय मोहोर उमटविणारे ओमर शरीफ यांना डेव्हिड लीन यांच्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटातील शरीफ अलीच्या भूमिकेबद्दल ऑस्कर पुरस्कारासाठी १९६२ मध्ये ओमर यांचे नामांकन झाले होते.

त्यांचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजी झाला.परंतु त्यांना या चित्रपटातील कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच चित्रपटात भूमिका करण्याच्या निमित्ताने मा.ओमर शरीफ यांनी प्रथमच इंग्रजी चित्रपटात अभिनय केला. त्याआधी ओमर शरीफ यांनी इजिप्तमधील २० चित्रपटांमध्ये काम केले होते. १९६५ मध्ये ‘पेल हॉर्स’ या चित्रपटात ओमर यांनी ग्रॅग्री पेकबरोबर काम केले. त्याच वर्षी पुन्हा डेव्हिड लीन यांच्या साथीने ‘डॉक्टर झिव्हॅगो’ या चित्रपटात काम करून पुन्हा एकदा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार पटकावला.

‘ब्लेझिंग सन’ या चित्रपटातील सह अभिनेत्री फतेन हमामा यांच्याशी मा.ओमर शरीफ १९५३ मध्ये विवाहबद्ध झाले.

‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटाबद्दल ओमर शरीफ यांच्या मनात एक हळवा कोपरा होता. सन २०१२ मध्ये त्यांनी ‘गार्डियन’ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘हा चित्रपट आपण केला तेव्हा ती एक ‘क्रेझी’च बाब ठरली होती. या चित्रपटात अभिनेत्री नाहीत, त्या वेळचे प्रख्यात कलाकार नाहीत किंवा मारझोड नाही. विशेष असे काहीही नाही, असे वाटले. परंतु दिग्दर्शक डेव्हिड लीन हे अत्यंत बुद्धिमान दिग्दर्शक होते. ते खरोखरच थोरच होते’ असे ओमर शरीफ यांनी म्हटले होते.

नंतरच्या काळात, १९६९ मध्ये जगभरात गाजलेल्या ‘मॅकेनाज गोल्ड’ या चित्रपटात ओमर शरीफ यांचीही भूमिका गाजली होती. खरं तर मॅकेनाज गोल्ड आला तोवर मा.ओमर शरीफ हे हॉलिवूडमधलं एकदम उत्तुंग व्यक्तिमत्त्व झालं होतं. केवळ त्यांच्यासाठी सिनेमांच्या पटकथा लिहिल्याचं दशक त्यांनी पार केलं होतं. हा दबदबा निर्माण केला तोही अमेरिका आणि इंग्लडमध्ये जन्माला न येता.

इजिप्तमध्ये आणि ग्रीक घराण्यात जन्मलेल्या ओमर शरीफ यांचं सगळं आयुष्य हॉलिवूडच्या अन्य कलाकारांपेक्षा वेगळं ठरलं. निळ्या, हिरव्या डोळ्यांच्या पाणीदार कलाकारांमध्ये काळ्याभोर डोळ्यांचा आणि मिशी राखलेला कलावंत नेहमीच उठून दिसला. हॉलिवूडमधली त्यांची एंट्रीच मोठी दणदणीत झाली होती. मॅकनोच्या भूमिकेतल्या ग्रेगरी पेकला कोलोरॅडोच्या भूमिकेतल्या ओमार शरीफ यांनी अक्षरशः खाऊन टाकलं. पोलिस ज्याच्या मागावर आहेत, असा कोलरॅडो आपल्या स्वभावातल्या हिंसेचं समर्थन करत नाही. ओमारने आपल्या डोळ्यांनी साधलं इतकाच तो फरक. थंडपणे शत्रूचा काटा काढायचा, आपल्या टोळीतल्या लोकांनाही दया दाखवायची नाही, इतका कमालीचा राक्षसीपणा नुसत्या नजरेने व्यक्त करण्याची पद्धत शरीफ यांनी रूढ केली, जी शोलेतून नंतरच्या हिंदी सिनेमांत झिरपली.

ओमर शरीफ यांचे १० जुलै २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..