लव्ह इन टोकियो’, “शागीर्द’, “लव्ह इन सिमला’, “जिद्दी’, “एक मुसाफिर एक हसीना’ अशा गाजलेल्या चित्रपटांनी रसिकप्रिय झालेले जॉय मुखर्जी यांचे वडील शशधर मुखर्जी हिंदी चित्रपटनिर्माते होते; अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओ त्यांच्या मालकीचा होता. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला.”लव्ह इन सिमला’ हा जॉय मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातील “रोमॅंटिक’ नायकाच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या वडिलांनी “हम हिंदुस्थानी’ आणि “एक मुसाफिर एक हसीना’ असा “डबल बार’ उडवून दिला. जॉय मुखर्जी यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले; त्यातून त्यांची “स्टाईल’ निर्माण झाली. ते साठच्या दशकातील लोकप्रिय अभिनेते होते. “लव्ह इन टोकियो’ या चित्रपटानंतर आलेला “सांज और आवाज’ हा चित्रपट फारसा चालला नाही. अभिनय करत असतानाच, त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली, तसेच दिग्दर्शनही केले. माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांना घेऊन “हमसाया’ हा चित्रपट त्यांनी बनवला. मात्र चकवा देणारे कथानक आणि नायिकांतील वादामुळे या चित्रपटाला “बॉक्स ऑफिस’वर चांगली कामगिरी करता आली नाही. “सांझ की बेला’ आणि “उम्मीद’ या चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली.”बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी’, “ओ मेरे शाहे खुबा, ओ मेरी जाने जनाना’, “वो है जरा खफा खफा’, “बडे मिया दीवाने’ अशी त्यांची गाणी अत्यंत गाजली आहेत. मा.जॉय मुखर्जी यांचे ९ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply