धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मा.बी. आर.चोपडा यांनी दिले आहेत. बी. आर. चोपडा यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० साली कानून चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर आणि १९९८ साली फिल्मफेअर जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मोठ्या पडद्यावरील यशानंतर बी. आर. यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवून “महाभारत’ महामालिका तयार करून ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचविली होती. या मालिकेनेही लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
बी. आर.चोपडा यांचे ५ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply