नवीन लेखन...

टीव्ही चॅनेल्स आणि मालिकांचे मराठी संस्कृतीसाठी योगदान (?)

सध्या आपण माहितीच्या युगात जगतोय. टिव्ही चॅनेल्स आता बोकाळली आहेत. मराठीतही कधी नव्हे ती एका हाताच्या बोटावर न मावण्याएवढी चॅनेल्स आता सुरु झाली आहेत. हिंदीची तर विचारायलाच नकोत.

या चॅनेल्सवर प्रसारित होणार्‍या कार्यक्रमांचा दर्जा हा एक संशोधनाचाच विषय होऊ शकेल. बहुतेक सर्वच चॅनेल्सवर अनेक महिने चालणार्‍या सिरियल्सचा धुडगुस चालू आहे. या मालिकांतल्या पात्रांना अमरत्व मिळालंय का असा प्रश्न पडावा. सासू कधी म्हातारी होतच नाही. वर्षानुवर्ष ती तरुणच असते. विवाहबाह्य संबंध म्हणजे या मालिकांचा अगदी हॉट पॉईंट. याची बायको त्याची मैत्रिण होते तर त्याची बायको तिसर्‍याच कोणाबरोबर गुण उधळत असते..

मराठी संस्कृती या मालिकांमधून आता इतकी पुढारलेय की आता सरोगेट मदर सारखे विषयही या मालिकांतून घरोघरी पोहोचलेयत. घटस्फोटतर अगदी कॉमन झालेयत.

चार दिवस सासूचे या मालिकेने तर उच्चांकच गाठला. त्याआधी आभाळमायाही वर्षानुवर्ष सुरुच होती. या गोजिरवाण्या घरात सुरुवातीला फारच छान होती पण नंतर पूर्णपणे भरकटली. कुलवधूने लोकांना वेड लावलं, पण तिथेही दररोज नवनवीन आचरटपणा सुरु झाला. जय मल्हार म्हणजे एक मोठ्ठी लव्ह स्टोरी झालेय. थांबायलाच तयार नाही…

एका काळी गाजलेल्या चिमणरावसारख्या निखळ आनंद देणार्‍या मालिका आता का तयार होत नाहीत? मुलखावेगळी माणसं, गजरा यासारखे कार्यक्रम आता का होत नाहीत? निर्मात्यांची तयारी नाही की प्रेक्षकांची अभिरुचीच बदललेय?

या विषयावर आपलीही प्रतिक्रिया असेलच ना? मग ती आपल्यासारख्याच लाखो वाचकांनी वाचायला नको? मग वाट कशाला बघताय? चला… फक्त इथे एक क्लिक पुरेशी आहे मराठीसृष्टीवर आपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी. यासाठी कोणतीही पूर्वअट नाही. नोंदणी नको की पैसे भरणंही नको.

मराठीत लिहा, इंग्रजीत किंवा अगदी रोमन लिपीतून मराठीत. महत्त्वाचं आहे ते लिहिणं, अभिव्यक्त होणं.

हा तर झाला एकच विषय आणि एकच प्रश्न. दररोज याचसारखे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. आपल्याला लिहायचंही असेल. पण लिहायचं तर कुठे लिहायचं? कोण छापणार हाही प्रश्न आहेच.

पण आता याचा विचार करायची गरजच नाही. मराठीसृष्टीने आपल्याला उपलब्ध केलंय एक मुक्त व्यासपीठ. कोणत्याही विषयावर आपल्या मनातलं लिहा आणि किमान ४ लाख मराठी माणसांपर्यंत पोहोचा. कितीही लिहा. शब्संख्येचं बंधन नाही. काहीही लिहा… सेन्सॉरशिप नाही… पण अट एकच.. वैयक्तिक टिका-टिपणी टाळा आणि सभ्य, सुसंस्कृत भाषेतच लिहा. आपल्या लिखाणाला कमीतकमी ६ तासात आणि जास्तीतजास्त २ दिवसांत प्रसिद्धी दिली जाईल.

लिखाण करण्यासाठी आवश्यक आहे फक्त मराठीसृष्टीवर नोंदणी, तीसुद्धा पूर्णपणे मोफत. मराठीत लिहिण्यासाठी सगळी साधनसामुग्री वेबसाईटवर आहेच. मग आता वेळ कशाला घालवायचा?

चला… उचला लेखणी….. सॉरी…. उचला माऊस आणि मराठीसृष्टीवर लिहिण्यासाठी इथे क्लिक करा….

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..