टेनिस खेळल्यास हा आजार होतो म्हणून त्याचे नाव ‘टेनिस एल्बो’ असे पडले असले तरी हा आजार कोणालाही होऊ शकतो. टेनिस एल्बो म्हणजे दुखरा कोपरा. मनगटाला दंडाशी जोडणाऱ्या सांध्यावर ताण पडल्यावर कोपरा सुजतो. या आजारात कोपराच्या बाह्य भागाला वेदना होतात.
कसा होतो? : हात सतत पूर्ण ताठ ठेवून काम केल्याने किंवा एकाच प्रकारे हातांची हालचाल होत असल्यास त्याचा भार कोपरावर पडून हा आजार होऊ शकतो. यामध्ये वयाचाही प्रभाव पडतो. टेनिस एल्बो झालेल्या बहुतांश व्यक्तींचे वय ३५ ते ५० यादरम्यान असते.
टेनिस एल्बोची लक्षणे कोपराच्या बाह्य भागात वेदना होतात., कोपरावर बाहेर आलेल्या हाडाचे टोक दुखरे होते. वस्तू पकडताना किंवा हालचाल केल्यास मनगटात वेदना होतात, हाताच्या स्नायूंवर ताण देणाऱ्या हालचाली केल्यास (वजनदार वस्तू उचलणे इ.) वेदना होतात. सकाळी झोपेतून उठल्यावर हाताची हालचाल नीट होत नाही. हाताला मुंग्या येतात.
टेनिस एल्बो वर उपचार
आराम : त्रास होत असलेल्या हाताने स्क्रू ड्रायव्हर, हातोडी किंवा अन्य वजनदार वस्तू पकडणे काही काळासाठी बंद करावे. खरे तर आदर्श उपचारपद्धतीत कोपराला सहा आठवडे आराम देणे हे योग्य असते. पण दैनंदिन जीवनात हाताने करण्याची सर्व कामे बंद करणे शक्य होत नाही, म्हणून जड वस्तू न उचलण्याची खबरदारी घ्यावी.
बर्फ : त्रास होत असलेल्या ठिकाणी बर्फाचा शेक द्यावा.
व्यायाम : नुसता आराम केला तरी स्नायू कमजोर होतात व काम सुरू केल्यावर पुन्हा दुखू लागतात. त्यामुळे दंडाचे तसेच मनगटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा.
टेनिस एल्बो वरील औषधे हातावरची सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
आजार बळावल्यास काहीवेळा शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबला जातो.
प्रतिबंधात्मक उपाय : स्नायू मजबूत राहिल्यास कोपराजवळचे सांधे ही मजबूत राहतील.
हाताचे दंड, कोपरा, मनगट मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.डॉ. रामप्रभू, अस्थिरोगतज्ज्ञ,
Leave a Reply