विज्ञापानातल्या हिरो ने डीओ लावला
सुंदर पोरी त्याला, येउनी बिलगल्या.
सदू ने ही डीओ लावला
तिला पटवायला, चौपाटीवर आला.
डीओचा सुगंध दरवळीत, तिच्या जवळ पोहचला.
तिला होतील एलर्जी, ती पटा-शिंकली
बहाणा करून ती, दूर निघोनी गेली.
सदूची प्रेमकहाणी, सुरवातीलाच संपली.
असे कसे घडले, सदूला नाही कळले.
विवेक म्हणे सदू बाबा भ्रमित विज्ञापने पाहुनी, असेच लोक बुडती.
— विवेक पटाईत
Leave a Reply