सुमारे साडेसात वर्षांच्या अंतराने ज्याच्या आयुष्यातील वर्षांचे शतक चुकले त्या एका अद्भुत बालकाचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतामधील कूटामुंड्रात झाला. लहान असताना तो एकटाच यष्टीने गोल्फचा चेंडू पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या एका टाकीवर मारून सराव करीत असे असे ऑस्ट्रेलियातील लोकसाहित्य सांगते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने बोवराल शाळेकडून खेळताना पहिले शतक काढले. आपले काका जॉर्ज व्हॅटमॅन यांच्या नेतृत्वाखालील संघाचा खेळ पाहता-पाहता तो धावलेखकाचे काम करू लागला. एका सामन्यात त्याला खेळण्याचीही संधी मिळाली. 1920-21च्या हंगामात पिताश्री जॉर्ज ब्रॅडमन त्याला सिडनी क्रिकेट मैदानावर अॅशेस मालिकेतील एक सामना दाखविण्यासाठी घेऊन गेले आणि त्या कुमाराने आपले दृढनिश्चयी बोल अभिव्यक्त केले : या मैदानावर एक ना एक दिवस मी खेळणारच!
सर डोनल्ड ब्रॅडमन यांचे आजही शाबूत असलेले काही विक्रम असे :
-
किमान 20 कसोटी डाव खेळलेल्या फलंदाजांमध्ये सर्वोच्च (पारंपरिक) सरासरी – 99.94
-
5 सामन्यांच्या मालिकेत सर्वोच्च सरासरी – 201.50
-
सुमारे 36 टक्के डावांमध्ये शतके. (80 डावांमधून 29 शतके)
-
क्रमांक पाचच्या फलंदाजाचा सर्वोच्च डाव – 304 धावा.
-
क्रमांक सातच्या फलंदाजाचा सर्वोच्च डाव – 270 धावा.
-
एका मालिकेत सर्वाधिक धावा – 974.
-
खेळाच्या एकाच सत्रात सर्वाधिक शतके – 6.
-
एका दिवसाच्या खेळात सर्वाधिक धावा – 309.
-
सर्वाधिक द्विशतके – 12.
-
एका मालिकेत सर्वाधिक द्विशतके – 3.
-
सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये
शतके.
-
2000, 3000, 4000, 5000 आणि 6000 धावा कमीत कमी डावांमध्ये जमविण्याचा विक्रम. अनुक्रमे 22, 33, 48, 56 आणि 68 डाव.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply