प्रा. विजय पोहनेरकर यांची
एक लाईटमुडची
खुसखुशीत कविता ……
” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही ”
उगीच गळा काढून
बोन्बलायचं नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही
कामाच्या वेळेस
खूप काम करायचं
कष्ट करतांना
झोकून द्यायचं
पण Life कसं मजेत जगायचं …….
फिरा वाटलं फिरायचं
लोळा वाटलं लोळायचं
सुनंला काय वाटल ?
पोट्टे काय म्हणतेल ?
फारसा विचार करायचा नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही ……….!!
पार्टी करा वाटायली
पार्टी करायची
आरती करा वाटायली
आरती करायची
Picture पहा वाटतो
Picture पहायचा
समोसा खा वाटतो
समोसा खायचा
B. P. वाढल का ?
अन शुगर कमी होईल का ?
मला जर ऍटॅक आला
तर दवाखान्यात कुणी नेईल का ?
अरे…….,
लोकं कुत्र्या , मांजराला सुद्धा उचलून नेतेत
तू तर माणूस आहेस ,
मग , नको ती चिंता करतो कशाला ?
स्वतःही परेशान व्हायचं नाही
अन दुसर्यालाही ” जाळूजाळू घ्यायचं नाही ”
अन डोक्याला अजिबात
ताण करून घ्यायचा नाही ….!!!
लाकडं बाभळीचे आणतील
का चंदनात जाळतील ?
खालून-वरून रॉकेल टाकतील
का एखादा किलो तरी चांगलं तूप टाकतील ?
सगळे पोरं येतील का ?
मला खांदा देतील का ?
फालतू गोष्टीची काळजी
करायची नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही …….!!!
पोट्ट्याचं लग्न होईल का ?
त्याला कुणी पोरगी देईल का ?
नातवाला
english medium मधे टाकायचं
का Semi english च ठेवायचं ?
अरे तुला काय करायचं ?
मर न ! थोडं जग नं !!
नको त्या गोष्टीचा
कशाला ताण करून घेतो ?
स्वतःही जागतो
अन दुसऱ्यालाही जागवतो
बगलतलं काढून बाजारात
मांडायचं नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही ……!!!!
लग्न झाल्यावर पोट्ट
विचारील का नाही ?
सुनेला पुरणाची पोळी
येईल का नाही ?
कुलाचार करतेल का ?
सवाष्ण जेवू घालतेल का ?
शेती ठेवतील का विकतील ?
माझं श्राद्ध-पक्ष करतील का ?
आहेत का नाही फालतू प्रश्न ?
अरे बाबा ,
” मल्हार ” गा वाटतो
मल्हार गा …
मकाचं कणीस खा वाटतं
मकाचं कणीस खा
लावण्या आवडतात
सुरेखा पुणेकरचा
कार्यक्रम पहायचा
दिंडीत जा वाटतं
पंढरपूरला जायचं
आंबट गाऱ्हाणे करायचेच नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही …….!!!!!
सगळ्याचं सगळं करायचं
पण ढोपराचा पंचा काढून
द्यायचा नाही
अन उगीच डोक्याला
ताण करून घ्यायचा नाही ……!!!!
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
Leave a Reply