नवीन लेखन...

तर असा असतो मुंबईकर

पुणेकरां बद्दल बर्‍याच आख्यायिका ऐकल्या असतील. आता पहा सच्च्या मुंबईकराची काही लक्षणे –

१. सगळे पैसे एका जागी ठेवणार नाही. थोडे पाकिटात, थोडे ह्या खिश्यात, थोडे त्या खिश्यात आणि थोडे बॅगमध्ये..

२. ऑफिसमध्ये वापरायचे बूट ऑफिसमध्येच ठेवेल. घरून ऑफिसला जाताना चप्पल किंवा दुसरेच बूट घालेल.

३. पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसला जाताना काहीही विसरेल पण चुकूनसुद्धा छत्री विसरणार नाही.

४. बाळासाहेब ठाकऱ्यांसाठी मनात एक विशेष स्थान असेल. भले मत शिवसेनेला देत नसला तरी.

५. थंडगार पाणी प्यायल्याशिवाय तहान शमणार नाही. साधं पाणी एरंडेल प्यायल्यासारखं तोंड करून पिईल.

६. भरपूर वेळ हातात असला तरी समोर असलेली ट्रेन, बस जाऊ देणार नाही. सुटत असेल, तर धावत जाऊन लोंबकळेल.

७. चौथी सीट किंवा दारातल्या फूटबोर्डवरील जागा मिळाली की गड सर केल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकेल.

८. बसमध्ये ‘स्त्रियांसाठी’ लिहिलेल्या जागेवर बसणार नाही. बसल्यास ‘ऑन डिमांड’ लगेच सीट रिकामी करेल.

९. प्रत्येक पोलिस त्याचा ‘मामा’ असेल.

१०. सचिन तेंडूलकरला ‘सच्या’ किंवा ‘तेंडल्या’च म्हणेल.

११. भूक लागली आहे म्हणून नाही तर वेळ आहे म्हणून खाईल.

१२. घरच्या धकाधकीतून विश्रांती मिळण्याचं ‘ऑफिस’ हे एकमेव ठिकाण आहे, हे त्याला फार लौकर समजलेलं असेल. त्यामुळे कितीही, काहीही होवो. पाण्यातून, गर्दीतून, घाणीतून, वाट काढत काढत ऑफिसला जाईलच. दांडी मारणार नाही.

१३. पारसी व्यक्तीसाठीही मनात एक विशेष स्थान असेल.

१४. कुणाशीही बोलताना संभाषणाची सुरुवात नेहमी हिंदीतूनच करेल.

१५. ‘बस’च तिकीट लांब घडी करून घड्याळाच्या पट्ट्यात खोवून ठेवेल. कंडक्टरनी विचारलं तर पेपरमधून वर न पाहता मनगट तिरकं करून दाखवेल.

१६. चुकूनही टॅक्सीने जाणार नाही, लोकल किंवा BESTच.

१७. पत्ता विचारला तर नीटपणे आणि खरा सांगेल.

१८. एकदा कामाला भिडला की बाकी गोष्टींकडे त्याचे लक्ष जाणार नाही. बाजूला रंभा येऊन उभी राहो नाहीतर उर्वशी.

१९. शेअरबाजाराबद्दल त्याच्या मनात आदर असेल. स्वत: त्यात उतरला नाही, तरी घृणा तर निश्चितच नसेल.

२०. लोकलमध्ये शेजारच्याला धक्का न लावता व्यवस्थित फोल्ड करून पेपर वाचेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..