तार, तार, तार,
साऱ्यांची तिच्यावर होती मदार,
कधी घेवून येत होती बातमी सुखाची,
तर कधी आणीत होती बातमी दु:खाची,
परंतु आता तीच तार,
गेली काळाच्या पडद्या आड,
तारेची ती टिक, टिक,
नाही ऐकायला आता मिळणार,
तार नावाचे यंत्र नाही
आता पाहायला मिळणार,
तारच गेली पडद्या आड,
तर कोण तिला बरे भेटणार?
तारेचा इतिहास होता,
कित्येक वर्षांचा जुना,
मागे राहिल्या आता,
फक्त त्याच्या पाऊल-खुणा,
नविन आली संदेश यंत्रणा,
तारेचा हा इतिहास झाला जुना.
……………….मयुर तोंडवळकर
— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Leave a Reply