कित्येक वर्षानंतर ती
आज माझे पहिले प्रेम
मला सामोरी आले होते…
का कोणास जाणे
तिच्या चेहऱ्यावरील
पूर्वीचे ते हसू चांदण्याचे
चोरीस गेले होते…
येता जवळी ती माझ्या
का कोणास जाणे
आमचे डोळे अचानक
अनोळखी
झाले होते …
किंचित दूर
चालत गेल्यावर ती
तिच्याकडे वळून पाहत
मी सुखी रहा
मनात वदले होते …
तिच्या प्रेरणेनेच
माझ्या सारख्या
दगडाला ही
मोल्यवान हिरयाचे
रूप लाभले होते …
तिच्या ही नकळत
तिने माझ्यासह जगावर ही
किंचित उपकारच केले होते …
तिच्यावरील माझे प्रेम
मी माझ्या हृदयात
कस्तुरीसारखे जपले होते …
असे पर्यंत मी
जगात या माझे तिच्यावरील प्रेम
मला आणि मी गेल्यावरही
आता जगाच्या कामी येणार होते …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply