नवीन लेखन...

तुम्ही मांसाहार का करता ?

शक्तीसाठी? 

— पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे.  तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!!  शेतकर्यांच्या सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?

अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजली जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?

मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?

जीभेवरच्या चवीसाठी??

मांसाला कसली आलीय चव. चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना.  तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!

जीवनसत्वांसाठी??

मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?

मग मांसाहार कशासाठी?

खरे तर निसर्गाने ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.

मानवी शरीरचनाच मूलत:  शाकाहार पूरक अशीच आहे. असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी याचा अर्थच हा आहे  की माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!

मग का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?

वैद्यकशास्त्र सांगते, मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात. मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.

अध्यात्मशास्त्र सांगते, मांसाहारामुळे काम, क्रोध, मद, मत्सर इ. दुर्गुण माणसात प्रबळ होतात  आणि असुरी प्रवृत्ती वाढते.

असं म्हणतात वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला. वानर आजही शाकाहारी आहे. ऊत्क्रांतीच्या प्रवासात वानरापासून नर होताना माणूस जानवर कसा झाला कुणास ठाऊक?

पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!

शुद्ध आहार शाकाहार, निसर्ग निर्मिती अशी आहे जो प्राणी ओठाने पाणी पितो त्याने शाकाहार करावा आणि जो प्राणी जिभेने पाणी पितो त्याने मांसाहार करावा.

शाकाहारी व्हा!!!

तनाची, मनाची अन् आत्म्याची पवित्रता वाढवा . पटलं तर बघा. ..नाही तर सोडून द्या. ..

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन 

 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..