खुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा !
मस्त टामटुम कविता !
मी बोलावलं तर
तू येशिलही
पण तुला बोलवायचं की नाही
हेच मला ठरवता येत नाहीये
एकतर तू आलीस तर
मी माझ्या जहाजावर आहे ते बुडण्याची दाट शक्यता
आणि मी तिकडे आलो तर
हे जहाज दिशाहीन होणं अटळ
एकतर भरतीच्या वेळा मला कळत नाही आणि भरती माझ्या हातात ही नाही
केव्हाही येते काळवेळ न पाहता
बाहेर उसळणार्या या अथांग पाण्याचं
मी एकवेळ करू शकतो नियोजन
पण आतल्या या अनावर दर्याचं काय करावं
हा मोठाच प्रश्न आहे
तू फक्त तुझे चंद्र आवर
आणि वाट पहा माझ्या बोलावण्याची
अशी कितीतरी निमंत्रणं
मी माझ्या शिडामधे लपवून ठेवली आहेत आणि लागू दिला नाही पत्ता कप्तानाला
म्हणून तरंगतोय अजून या अथांग पाण्यावर
बये !
— संजय चौधरी
Leave a Reply