नवीन लेखन...

तो….



काही गोष्टी मनाला चटका लावुन जातात…. कधीतरी खुप लहानशी गोष्ट मनात खळबळ माजवुन जाते.. मग प्रश्नांच वादळ सुरु होत मनात….. नुसत्या प्रश्नांचं नाही तर उत्तर नसलेल्या नुरोत्तर प्रश्नांचच….!! त्या गोष्टीचा शेवट असा होतच नाही..झालचं तर दोन आसवांनी ते वादळ शांत होत पण कदाचित परतण्यासाठीच…….

त्या दिवशी असच झालं..मी त्याला भेटले…त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती…..ओठांवर ते निखळ पण अनिश्चीत हास्य,बोलका चेहरा…काहीस सांगणारा…..कि विनवणारा?? तो मला निशब्द करणारा…..तो जेमतेम आठ दहा महिन्यांचा असेल तेव्हा…त्याच्या सारखे दुसरे…अनेकजण तिथे होते…त्याच्या इतकेच निरागस..निशब्द…तरिही बोलके…पण तो…..? त्याच वागणं विलक्षण होत…..मनाल अगदी सुन्न करणारं….त्या दिवशी आम्ही श्रीवत्स (पुणे) मध्ये गेलो होतो….श्रीवत्स! एक अनाथाश्रम! एका दिवसापासून ते सहा वर्षांच्या मुलांच आनाथलय…..मी तिकडे गेले आणि त्या मुलांच्या किलबिलाटात पहिल्यांदा हरवुनच गेले……. चोहिकडे मुलचं मुलं… आत गेल्यावर शुद्ध हरपायचीच बाकी होती…..त्य सर्वाचं हसणं, बागडणं..एकटचं खेळणं ..स्वत:च्या बेडवर लोळणं,मध्येच कुणाचतरी रडणं…आम्ही सगळेच त्यांच्याशी खेळण्यात गुंग झालो….ते निरागस जीव देखिल आमच्या बरोबर एकरूप होउन खेळत होते..मला तर कळतच नव्हत की कोणाल उचलुन घ्यावं कोणाशी खेळावं…मी जवळ जवळ सगळ्यांशीच खेळत होते…पण तो…तो मात्र स्पष्ट आठवतो… त्याच्याशी अशीच खेळत होते. तोही मस्त खदखदुन हसत होता..पाचच एक मिनिटं झाली असतील तितक्यात कोणीतारी मला हाक मारली….म्हणुन उठावं म्हणाले तर समजेचना त्याला सोदडुन कशी उठु? तशीच उठले पण क्षणभर थांबले…तोही मझ्याकडे काहीशा वेगळ्या नजरेने पाहु लागला…मला काहिच सुचेना..मी वळले.ऽअन् परत मगे वळुन पाहिलं…तो तसाच होता स्तब्ध…साशंक…बघता बघता तो हसला…अगदी समजुतीनं…अणि स्वत:हाच शरीर गादीवर झोकुन दिलं…ह मग हसत हसतच स्वत:मध्ये रमुन गेला…मल काहीच सुचलं नाही… डोळे भरुन मी पट्कन त्याल उचलुन घेतलं..इवलसा जीव तो…पण किती निरपेक्ष..पण समजुतदार..समाधानी…का?..का? त्याने त्याचीआले आणि परिस्थिती ओळखली

होती?..मनात धस्स झालं त्या

जागी आपलं कोणाचं बाळ असत न
र रडुन गोंधळ घातला असता.. तिथलीही बाळं सामान्यपणे तशीच करतात..स्वाभविकच आहे ते.. पण तो त्या परिस्थितीला अवध्या दोन अडीच वर्षांच्या वयात लवकर शकला? की त्याला या सगळ्याची सवय झाली आहे? खर तर मी श्रीवत्स मध्ये गेले होते ते मला समाधान मिळावं म्हणुन…तिथल्या लहाग्यांच्या चेहर्‍यावर हासु द्यायच होत…..त्या व्यतरिक्त अजुन काहीच करु शकत नव्हते …पण त्या चिमुरड्याच ते निखळ हास्य पाहुन मला वाटल की जणु तेच मला समाधान मिळावं म्हणुन हसतयं…

त्या नंतर बराच वेळ तिकडे होते..त्याच्या शिवाय बाकी बर्‍्याच जणांशी खेळले..बोलले ….अणि शेवटी आम्ही तिथुन निघलो.. जड मनानं…एक जणिवेसह…आपल्याला अनाथ हा शब्द्ध केवळ उच्चारायया देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात…परिस्थितीने मांडलेल्या खेळात.. आपलं असं अस्थित्व निर्माण करण्याच्या धडपडीत…खरचं का ते जगतात?

मी तिथुन निघाले मनात खळबळ घेऊन… आणि त्याच ते निरपेक्ष माझ्या समाधानासाठीच हसण मनात बिंबवुन…..

— स्नेहा जैन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..