बागेतील तारका-
३८ त्याग वृत्ति
जीवनाच्या सांज समयीं
उसंत मिळतां थोडीशी
हिशोब केला स्वकर्माचा
वर्षे गेली होती कशी
दिवसा मागून वर्षे गेली
नकळत अशा वेगानें
सुख दुःखाच्या मिश्रणीं
जीवन गेले क्रमाक्रमाने
आज
वाटे खंत मनीं
आयुष्य वाया दवडिले
ऐहिक सुखाच्या मागे जातां
हातीं न कांहीं राहिले
‘घेणे’ सारे आपल्यासाठीं
करीत जीवन घालविले
‘देण्या’ मधल्या आनंदाला
मन सदा वंचित राहिले
सुधारुन घे आतां तरी
अनुभवाने चूक आपली
उर्वरित वर्षे जाऊं दे
त्यागवृत्तीमध्ये सगळी
भोगातले सुख कसे ते
क्षणांत येवून क्षणांत जाई
त्यागातील समाधान परि
उशीरा लाभून सदैव राही
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
419
विवीध-अंगी *** ७
शरीरातील ३६ तत्वे-
( पंच महाभूते ) १- पृथ्वी २- आप ३- तेज ४- वायु ५- आकाश
६- अहंकार ७- बुद्धी ८- अव्यक्त
( ज्ञानेद्रिये ) ९- कान १०- नाक ११-डोळे १२- त्वचा १३- जिव्हा
(कर्मेंद्रिये) १४- हात १५- पाय १६- वाणी १७- उपस्थ १८- गुद १९- मन
( ज्ञानेद्रियांचे पांच विषय) २०- शब्द २१- स्पर्श २२- रुप २३- रस २४- गंध
(कर्मेंद्रियाचे पांच विषय) २५-चालणे २६- बोलणे २७- घेणे २८- देणे २९-मळमुत्राचा त्याग
३०- इच्छा ३१- द्वेश ३२- सुख ३३- दुःख ३४- चेतना ३५- धृति ३६- संघात
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply