काडीही हलत नाही
त्याच्या मर्जीशिवाय
आणि मी जग बदलू पाहतोय !
काडी हलण्यालाही
वारा निमित्त असतो
आणि मी स्वतःला बदलू पाहतोय !
मी शांत
आणि स्थिर राहतो
तो माझी परीक्षा घेऊ पाहतोय !
माझे प्रेम
आणि तिचे प्रेम
एकत्र करू पाहतोय!
त्याची मर्जी
मी स्वीकारताना
आता तो पाहतोय !
कवी – निलेश बामणे ( बी डी एन )
Leave a Reply